महाराष्ट्रराजकीय

… त्यामुळे अजितदादा होऊ शकतात “मुख्यमंत्री”  

  • उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होत नाही  याची देवाभाऊंनी परंपरा केली खंडित  
  • अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा ०६ वेळा केला विक्रम
  • आता ते मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  गुरुवारी (दिनांक ०५)  भाजप प्रणित महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या नावावर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम प्रथापित झाला आहे. तसेच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपात शपथ घेतली. अजितदादांच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती ; परंतु त्याबदल्यात उपमुख्यंमत्री आणि जास्त खाती घेण्यात आल्याने त्यांना या पदाने हुलकावणी दिल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.

त्यातच महाराष्ट्रात आजपर्यंत जे उपमुख्यमंत्री झालेले कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत असा इतिहास आहे ; मात्र हा इतिहास पुसण्याचा योग देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गुरुवारी पार पडलेल्या महायुतीच्या शपथ विधीमध्ये आला. त्याअनुषंगाने सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजितदादा ही भविष्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर विराजमान होतील असा आशावाद..! महाराष्ट्रासह देशात असणाऱ्या त्यांच्या समर्थकांना आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत नाशिकराव तिरपुडे, सुंदरराव शेळके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ (दोन वेळा ), विजयसिन्ह मोहिते पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार ( सहा वेळा ), देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे  यांचा समावेश आहे. पैकी रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील आणि अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्या त्यावेळी पक्षातील विविध राजकीय परिस्थितीमुळे मुख्यंमत्री बनण्याची संधी असताना त्यामध्ये यश मिळाले नाही.

त्यानंतर २०१४ नंतर  राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात  भाजपचे मुख्यंमत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. त्यानंतर २०१९ ते २०२४ या कालावधीमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भाजप आणि एकसंघ शिवसेना तर  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांनी एकत्रित आघाडी म्हणून निवडणूक लढली. मात्र सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआचे सरकार प्रस्थपित झाले. या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री म्हणू अजितदादा यांनी शपथ घेतली.

विधानसभा निवडणूक २०१९ झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाची परिभाषाच बदलली आहे. राजकारणातील मित्र शत्रू आणि शत्रू असणारे मित्र बनल्याचे पाहावयास मिळत आहेत. त्यामाध्यमातून कोणी २५ वर्षाची मैत्री तोडताय, तर कोणी वर्षानुवर्षे जपलेली नाती तोडण्यापर्यंत मजल मारली गेली. त्यातून सत्तेत बसलेल्या प्रमुख पक्षाने एकसंघ शिवसेना आणि एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून महायुतीने गेली अडीच वर्षे आणि आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकतर्फी सत्ता प्रस्थापित केली आहे.

त्यामध्ये उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंमत्री म्हणून तर मुख्यंमत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यंमत्री म्हणून तर विक्रम प्रथापित करीत सहाव्यांदा उपमुख्यंमत्री म्हणून अजितदादा यांनी शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंमत्री नंतर मुख्यंमत्री पदाची शपथ घेत उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री होत नाही ही परंपरा खंडित केली. त्यामुळे उपमुख्यंमत्री अजितदादा हे ही भविष्याच्या राजकारणात मुख्यंमत्री होतील असा आशावाद अजितदादांच्या महाराष्ट्रसह इतर राज्यातील समर्थकांचा वाढीस लागल्याचे पाहावयास मिळत आहे.