चार लाडक्या बहिणींसह ३९ जणांनी घेतली मंत्री म्हणून शपथ ; अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे जवळपास ३३ वर्षांनंतर दुसऱ्यांदा पार पडत असलेल्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये भाजप १९, शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ०९ अशा एकूण ३९ मंत्र्यांनी शपथविधी घेतला. या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी पुन्हा सत्तेत येण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आसल्याने ३९ मंत्र्यांमध्ये चार लाडक्या बहिणींनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तर ज्या सांगली जिल्ह्याचा यापाठीमागे असणाऱ्या विविध मंत्री मंडळात दबदबा असायचा त्या सांगली जिल्ह्याला या मंत्री मंडळात स्थान दिले नसल्याचे दिसत आहे. तर परळी, बीड येथील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांची मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
१६ व्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती व मित्र पक्षांनी २३५ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला. भाजप ने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी ४१ जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. त्याची प्रतीक्षा संपत रविवारी (दिनांक १५) नागपूर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारत शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या आणि नवीन आमदारांचा मेळ घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि २०२९ च्या अनुषंगाने शत प्रतिशत सत्ता आणण्यासाठी सर्वांचा समतोल राखला आहे.
त्याअनुषंगाने भाजपच्या वाट्याला १९ , शिवसेनेला ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ०९ असे एकूण ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी ने मंत्र्याचा कालावधी हा अडीच वर्षे असेल त्यानंतर दुसऱ्या आमदारांना मंत्री म्हणून संधी मिळेल असे जाहीर केले आहे.
महायुतीकडून मंत्री मंडळात शपथ घेतेल्याल्या मंत्र्याची नावे पुढील प्रमाणे
भाजप
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
- चंद्रशेखर बावनकुळे
- नितेश राणे
- शिवेंद्रराजे भोसले
- चंद्रकांत पाटील
- पंकज भोयर
- मंगलप्रभात लोढा
- गिरिश महाजन
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- अतुल सावे
- आशिष शेलार
- माधुरी मिसाळ
- मेघना बोर्डीकर
- आकाश फुंडकर
- अशोक उईक
- संजय सावकारे
- जयकुमार गोरे
—————————————
शिवसेना
एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
- उदय सामंत
- प्रताप सरनाईक
- शंभुराजे देसाई
- आशिष जैस्वअल
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- संजय राठोड
- संजय शिरसाट
- योगेश कदम
—————————————–
राष्ट्रवादी काँग्रेस
अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री)
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- आदिती तटकरे
- दत्ता भरणे
- मकरंद पाटील
- बाबासाहेब पाटील
- इंद्रनील नाईक
- नरहरी झिरवाळ
- माणिकराव कोकाटे