बातम्यामहाराष्ट्रराजकीय

प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण की दानवे

  • प्रदेशाध्यक्ष चंदकांत बावनकुळे मंत्रीपदी वर्णी
  • रिक्त झालेल्या पदावर भाजपकडून फिल्डींग

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची महायुतीच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असणारा प्रदेशाध्यक्षपदाचा भार देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणारे रवींद्र चव्हाण किंवा भाजपचे ज्येष्ठनेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यापैकी कोण एकाला संधी मिळणार आहे. त्यामध्ये आमदार चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे.

रवींद्र चव्हाण हे ठाण्यातील डोंबावली विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांना निवडून आले आहेत. गेल्या मंत्रिमंडळात सहभागी होते. आज नागपूर येथे होणाऱ्या शपथविधीसाठी ही त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यामध्ये त्यांचा समावेश न झाल्याने आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असल्याने त्यांच्या जागेवर कोणाचे नाव येणार याकडे भाजपमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यानंतर या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री व भाजप चे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे नाव ही समोर आले आहे. दानवे हे पक्षातील सर्वात जुने पदाधिकारी आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा ही अनुभव आहे. २०२९ मध्ये शत प्रतिशत भाजप करण्याच्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आहे. त्यामुळे येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये खेडोपाडी भाजप मजबूत करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे यांचे जूने संबंध असल्याने त्यांचे नाव ही आघाडीवर आहे ; जालना लोकसभा मतदार संघातून दानवे यानाचा पराभव झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याचा दृष्टीने त्यांना महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होवू शकते असे भाजप मधील राज्य पातळीवरील नेत्यांनी मत व्यक्त केल्याने प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण की दानवे हे बाजी मारणार हे आठवड्यात भारत निश्चित होईल.