बातम्या

उद्या चिंचवडचा राजा ‘श्री गणेश जयंती महोत्सव २०२५

सदगुरु श्री गंगागिरिजी महाराज संस्थानचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांची मिरवणूक व जाहीर सत्कार

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

चिंचवडचे आराध्य गणपती मंडळ ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन शनिवारी (दि. १ ) करण्यात आले आहे. त्यानिमित्त या महोत्सवात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

त्याचबरोबर अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थानचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांची मिरवणूक व जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चिंचवड, आळंदी, देहू, जेजुरी व कानिफनाथ मढी येथील धार्मिक संस्थानांचे प्रमुख विश्वस्त, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सन्मानीय आमदार, स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा पुढील प्रमाणे : –

मिरवणुक सुरुवात स्थळ व वेळ : शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चिंचवडगाव जुनी पोलिस चौकी छत्रपती शिवाजी चौक ते चिंचवडचा राजा गांधीपेठ आयोजित केली आहे. महाआरती : ‘चिंचवडचा राजा’ सायंकाळी ७ ते रात्री ७.३० दरम्यान होणार आहे.

सत्काराचा जाहीर कार्यक्रम रात्री ७.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत चिंचवडचा राजा मंडप चौक गांधीपेठ , चिंचवड येथे होणार आहे. तरी या पर्वणीचा सर्वांनी सहकुटुंब सहभागी होऊन लाभ घ्यावा आग्रहाची विनंती ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ परिवारातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.