…आता अभिनेता रितेश देशमुख मैदानात
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही
- मराठा बांधवांचा निर्धार
- ऐन सणासुदीच्या काळात मराठा बांधवांची मुंबईकडे रिघ
- दुसऱ्या दिवशी ही आंदोलनास मिळतोय वाढता पाठिंबा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
मराठा समजाला ओ बी सी समजातून आरक्षण मिळावे यासाठी देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहार. शुक्रवारपासून ते मुंबईत उपोषणाला बसले आहेत. त्याला राज्यातील लाखो मराठी बांधवानी पाठिंबा देत मुंबईत धडक दिली आहे. लाखो मराठा बांधव मुंबईत ढेरेदाखल झाल्याने ऐन सणासुदीला प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यात आता मराठी बांधवांसाठी अभिनेता रितेश देशमुखदेखील मैदानात उतरला आहे. ट्विट करत मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरुप आपल्या घरी परततील अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी कितीही दिवस मुंबईत राहण्याची तयारी दर्शवली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भावना मराठा समाजाने बोलून दाखवली आहे. त्यांच्या या भूमिकेवर रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे.
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा… श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र अशा आशयाचे ट्विट रितेशने केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि.30) दुसरा दिवस आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, नंतर एक दिवसाची परवानगी देण्यात आली. दरम्यान, काल पुन्हा एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

