पिंपरी चिंचवडबातम्याराजकीय

युवा मोर्चाध्यक्षपदी दिनेश यादव 

  • आमदार महेश लांडगे यांच्याहास्ते सन्मान 

लोकमान्य टाइम्स : भोसरी 

पिंपरी -चिंचवड शहर व जिल्हा भारतीय जनता पक्षाची १२६ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवा मोर्चा शहराध्यक्षपदी माजी स्वीकृत सदस्य आणि तत्कालीन युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश यादव यांची शहर कार्यकारिणीमध्ये युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह राष्ट्रीय कबड्डी खेळाडू युवा नेते योगेश लांडगे, उद्योजक संतोष लांडगे यांचे ते भाचे आहेत. स्वकृत्वावार संघटनात्मक पातळीवर कुदळवाडी -चिखली या परिसरात शक्ती बूथ केंद्र, सक्रिय सदस्य नोंदणीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली होती. तसेच युवकांचे संघटन आणि त्यामध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे तळागळापर्यंत पोहचवीण्याच्या कामाची दाखल तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतली होती. या कामगिरीच्या जोरावर पक्षाने त्यांच्यावर ही नवीन जबादारी टाकल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

याबाबत बोलताना दिनेश यादव म्हणाले पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्या संधीचे सोने करीन. आमचे मामा आणि भोसरी विधानसभा मतदार संघांचे आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.