महाराष्ट्रमुंबई

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा ; मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढणार

  • राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफूल पटेल यांची घोषणा
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्ष वाढतो

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

मुंबई महापालिका वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निणर्य प्रफुल पटेल यांनी जाहीर  केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेर्पयंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचे निर्देश दोनच दिवसापूर्वी दिलेले असताना सगळेलच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिबीर नागपुरात संपन्न होत असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय प्रफुल पटेल यांनी नागपूर येथे पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने  नाशिकमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षात जान फुंकली . भारतीय जनता पक्षानेही मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून मुंबई आपलीच असा नारा दिला आहे. पाटोपाठ अजित पवार यांच्या पक्षाने ही नागपुरात शिबीर सुरु आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालीका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. प्रफुल पटेल यांनी ए बी पी माझा शी बोलताना ही घोषणा केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतच पक्ष वाढतो

पक्ष वाढवायचा म्हंटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमचा पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात, पण आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नाही असे प्रफुल पटेल म्हणाले .