पिंपरी चिंचवड

केव्हा नव्हे ते गुंठा मंत्र्यांना आलाय प्रभागातील समस्यांचा कळवळा

  • निवडणुकीच्या तोंडावर झाली आहे उपरती
  • या स्पर्धेत नागरिकांच्या समस्याना तरी फुटली आहे वाच्या…

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

अखेर महापालिका निवडणुका होणार असल्याने पिंपरी चिंचवड शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसे शहरातील विशेषकरून भोसरी विधानसभा मतदार संघातील गुंठा मंत्री असणारे आणि त्यामध्यमातून आर्थिक माया मिळविलेले युवा नेत्यांना अचानक प्रभागातील समस्यांचा साक्षात्कार झाल्याचे दिसून येत आहे. इतर वेळी ज्या त्या प्रभागातून जाताना समस्या दिसून ही न बोलणारे आता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे  आश्वासन देऊ लागले आहेत. नागरिकांना ही माहित आहे समस्यांचा कळवळा आला आहे म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देर आये दुरुस्त आये निदान इतर वेळी समस्या दिसून ही गप्प असणारे आता त्याच समस्या ना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. ज्या समस्या नागरिकांनी अनेक वेळा व्यक्त करून ही सुटत नव्हत्या त्या या इच्छुकामुळे समस्याना वाच्या तरी फुटत असल्याने मतदारांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात जमिनीला सोन्यापेक्षा जास्त भाव निर्माण झाला आहे. त्यामध्यमातून शहरात गुंठा मंत्री वाढले आहेत. अर्थ करणातून राजकारण आणि पुन्हा राजकारणातून अर्थ कारण करण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश करायचा हा नवा ट्रेंड शहराच्या राजकारणात निर्माण होताना दिसत आहे. एकदा नगरसेवक झाले की त्यांचे राहणीमान बदलून जात असल्याचे दिसत असल्याने पैशाच्या जोरावर नगरसेवक पद आपल्या पाठीमागे लागले पाहिजे अशी क्रेझ युवा गुंठा मंत्री यांच्यात निर्माण होत असल्याने पैशाच्या जोरावर महापालिका निवडणूक लढण्यासाठी युवा नेते मैदानात उतरल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामध्यमातून पेड टीम बनवून प्रभागात कोणत्या समस्या आहेत याचा सर्व्हे करणे सुरु केले आहे. ती प्रत्येक एक समस्या् रोज समाज माध्यमावर मांडून प्रश्न संबंधित युवा नेते विचारत आहेत. त्याचे फोटोशेशन करून त्या बाबात त्या युवा नेत्याच्या नावाने प्रतिक्रिया देऊन आम्हाला नागरिकांच्या प्रश्नाचा किती कळवळा आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रकार सध्या वाढल्याचे दिसत आहे.

ते त्यांच्या प्रसिद्धीसाठी करत असले तरी प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांना वाच्या फुटली आहे. अनेक वेळा संबंधित प्रश्नासाठी त्या नागरिकांनी अनेक वेळा वेगवेगळे मार्ग शोधल तरी त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. आता मात्र हे प्रश्न नागरिकांना त्रास न होता आपल्या प्रसिद्धीसाठी उपस्थित करून त्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. तर त्यांच्या विरोधात असणारे माजी सत्ताधारी नेत्याच्या जीवावर प्रश्न सोडवून त्याबाबत समाज माध्यमावर त्याचे छायाचित्र झळकावून प्रसिद्धी मिळवीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला वाच्या फुटत असल्याने गुंठा मंत्री असणाऱ्या युवा नेत्यांना नगरसेवक होण्याची उपरती होऊ लागल्याने ते मतदारांच्या समोर जाण्यासाठी इतर वेळी उघड्या डोळयांनी प्रश्न दिसून ही मूग गिळून गप्प बसलेले आता निवडणुकीसाठी समोरे जाण्यासाठी त्याच प्रश्नांना समोर आणून ते सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत असल्याचे दिसत आहेत.