पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

शेखर सिंगांची बदली की  उचलबांगडी? ; भाजपला झुकते माफ,  राष्ट्रवादी, शिवसेनेला घेतले  अंगावर  

  • महापालिका निवडणुका होईपर्यंत बदली होणार नाही अशी होती चर्चा
  • राष्ट्रवावादी काँग्रेसच्या सूचनाकडे कानाडोळा केल्याने होती नाराज 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील भारतीय जनता पार्टीला झुकते माफ आणि  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ), शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षांना अंगावर घेण्याबरोबर प्रभाग रचनेत भाजपाला मदत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बद्दल सुचवूनही  मदत न केल्याच्या  नाराजीचा फटका पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना बसल्याची चर्चा आहे. निवडणूक होईपर्यंत बद्दली होणार नाही या आशेवर बसलेल्या सिंग यांची बद्दली नाशिकच्या कुंभमेळा आयुक्तपदी करण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश अनेक वेळा डावलल्याची भावना  निर्माण झाल्याने  तसेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलेल्या सूचनाना कराची टोपली दाखविल्याने  सिंग यांची उचलबांगडी केल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तात्कालीन आयुक्त शेखर सिंग यांनी   ३ वर्षे आणि २ महिने काम केले आहे. कोणताही आय ए एस अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त काळ एका जागेवर राहू शकत नाही असा नियम आहे ; मात्र सिंग हे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पक्षाच्या ओंजळीने  पाणी पीत होते असल्याचा  आरोप राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केले होता. त्याबाबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वारंवार तक्रार केली होती. त्यासंदर्भात  पवार यांनी अनेक वेळा याबाबत आयुक्त सिंग यांना समाज दिली होती (पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगीतील बोलणे ).  मात्र ते त्या सूचनाकडे कानाडोळा करत  असल्याची सल त्यांच्या मनात खदखदत होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरातील दोन दिवसाच्या जनसंवाद उपक्रमात त्यांच्या समोर प्रमुख पदाधिकारी यांनी ती खदखद बोलून दाखवित आयुक्त आमचे ऐकत नाहीत असा नाराजीचा सुर आळवीला होता.

मार्च २०२२ नंतर पिंपरी -चिंचवड प्रशासक राजवट सुरु झाली होती. या काळात प्रशासक म्हणून तत्कालीन आयुक्त सिंग यांनी शहरात मोठ्याप्रमाणावर विकास कामासाठी  निधी खर्च केला. त्यामध्ये प्रशासनकडून मोठा प्रमाणावर  भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटना यांनी निवेदनाद्वारे केला होता. सिंग यांच्या कारकीर्द मध्ये कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामावरील कारवाई मध्ये ही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने मनमानी केल्याचा आरोप आजमितीस ही सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विरोधी पक्ष, उद्योग संघटना गावकरी करत आहेत. 

शहरात डी पी स्कीम अस्तित्वात असताना सिंग यांनी  टी पी स्कीम चा घाट घातला होता. त्यामध्ये शेकडो एकर जमीन ताब्यात घेऊन गावाकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव प्रशासनाने आखाला होता असा आरोप गावाकऱ्यांनी खुले आम्ही करीत काही झाले तरी ही स्कीम आम्ही होऊन देणार नाही असा पवित्रा घेत बाधित शेतकऱ्यांनी महापालिका प्रवेश द्वारावर आंदोलन करीत सिंग यांच्या भूमिकेचा निषेध केला.  चिखली-कुदळवाडी, चऱ्होली, मोशी येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला. नागरिकांचा रोष पाहता प्रशासक सिंग यांना हा निर्णय रद्द करण्याची नामुष्की आली होती. विशेष करून चऱ्होली, चिखली कुदळवाडी येथील नागरिकांच्यामध्ये प्रचंड असंतोष होता.

यासंदर्भात तत्कालीन आयुक्त सिंग यांना निवेदन देण्यास संबंधित गावकरी गेले असता त्यांना भेट देणे टाळाटाळ करीत असल्याची भावना गावाकर्यां मध्ये निर्माण झाली होती. सिंग यांच्या या भूमिकेच्या विरोधात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या् कानावर सिंग करत असलेली मनमानी घातल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नागरिकांचा रोष पाहता टी पी स्कीम रद्द करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश  पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले.  यावेळी सिंग यांची मनमानी आम्ही खपून घेणार नाही असा इशारा संबंधित नागरिकांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर दिला होता. 

 पिंपरी चिंचवड शहरात नदी सुधार नावाखाली पवना नदीचे पात्र अरुंद करण्याचे काम हाती घेतले होते. तसेच यां प्रकल्पच्या नावाखाली शेकडो वृक्षाची कक्तल करण्यात आली. त्याला शहरातील निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी व शहरातील विविध सामाजिक संघटनानी विरोध केला होता. त्याच्याविरोधात शहरभर साखळी पद्धतीने महापालिका प्रशासन आणि प्रशासक यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. अनेक वेळा सर्व निसर्गप्रेमी यांनी तात्कालीन आयुक्त सिंग यांना नदी सुधार योजनेमुळे होणारे शहराचे नुकसान पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु काही झाले तरी ही योजना राबविण्यासाठी सिंग इरेला पेटले होते. त्याविरोधात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, निसर्गप्रेमी, वृक्ष प्रेमी, शहर वासियांना रस्त्यावर उतरले असताना ही प्रशासन आपल्याच भूमिकेवर ठाम होते. 

त्यांच्या विरोधात अनेक सामाजिक संस्थानी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सिंग यांच्या हम करे सो कायदा चा फटका राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यानाच बसत होता, अनेक वेळा कामे सुचवून ही त्यांना दिले जात नसलेले महत्व आणि महापालिका प्रभाग रचनेतील बद्दल, त्यावर आलेल्या हरकती याबाबत फक्त भाजप च्या दृष्टीने विचार आणि इतर घटक पक्षातील पक्षांबाबत केलेला दुजाभाव यां सर्वांच्या तक्रारीचा वाढता आलेख पाहता सिंग यांची बदली (उचलबांगडी?) करण्यात आल्याची चर्चा शहराच्या राजकारणात आहे.