रक्षकच बनले भक्षक ; भ्रष्टाचारामध्ये राज्यात महाराष्ट्र तर शहरात पुण्याचे अधिकारी सर्वांधिक लचखोर
- केंद्राच्या एन सी आर बी अहवालतून झाले स्पष्ट ; महाराष्ट्रात ७६३ तर पुण्यात २८ गुन्हे दाखल
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला होता ; मात्र केंद्र सरकारच्या २०२३ मध्ये एनसीआरबी अहवालतून समोर आलेल्या माहिती नुसार देशभरात ११३९ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राने ७६३ तर उत्तर प्रदेश राज्यात २१६ प्रकरणे समोर आली आहेत. शहर स्तरावर पुण्याने २८ प्रकरणासाह राजधानी आणि उपराजधानी असणाऱ्या अनुक्रम मुंबई आणि नागपूर शहराला पाठीमागे टाकले आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात ११३९ गुन्हे दाखल झाले आहे. यात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे प्रकरण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ७६३ गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक गुन्हे पुणे शहरात दाखल झाले आहे. तर दुसरा क्रमांकावर २१६ गुण्यासह उत्तर प्रदेश राज्याचा आहे. हरियाणात ३९ आसाम मध्ये ३१ जम्मू कश्मीर मध्ये २७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने हे रोखण्याचे मोठे आव्हान केंद्र आणि राज्य सरकार समोर आहे.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०२३ मध्ये ७६३ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातही लाचखोरीच्या घटना सर्वाधिक आहे. या वर्षी देखील लाजकोरीच्या घटनेत पुणे परिक्षेत्र राज्यात लाचखोरीच्या घटनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिला क्रमांक नाशिक परिक्षेत्रचा आहे. जिल्हानिहाय झालेल्या कारवाईचा विचार करता पुणे राज्यात अव्वल असून, तेथे ३० गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात मागील साडेसहा महिन्यांत एकूण ३९५ सापळे झाले. त्यात सर्वाधिक सापळे हे महसूल व पोलीस प्रशासनात झाले असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
राज्यात लाचखोरीच्या गुन्ह्यांत दोषसिद्ध करण्याकडे लाचलुचपत विभाग प्रयत्न करत आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडे मालमत्ता गोठविण्याची ९ कोटी ४ लाख ९३ हजार ७५३ रुपयांचे ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. सक्षम अधिकाऱ्यांकडे विभागनिहाय चौकशीची ३७३ प्रकरणे, लाचलुचपत विभागाने कारवाई केलेली २०१४ ते २०२५ पर्यंतची १८१ प्रकरणे निलंबित करण्यासाठी पाठविली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या लाचखोरांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामध्ये ३६ (क्लास १) , ३२ (क्लास २) आणि १०७ (क्लास ३) अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
२०१३ ते २०२५ या कालावधीत लाचखोरीच्या गुन्ह्यांत शिक्षा होऊनही बडतर्फ न केलेले २१ लाचखोर आजही मोकाट आहेत. असे असले तरी १ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत अवघ्या सव्वा तीन महिन्यांत २१२ लाचखोरांनी हात मारून ८९ लाख ७९ हजार १९५ रुपयांची वरकमाई केल्याचे उघड झाले आहे.
लाचखोरीमध्ये आघाडीवर महसूल, नगरपरिषद, पंचायत समिती, प.दु.म, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आरटीओ आणि विधी व न्याय विभागाचा समावेश आहे. तर अन्य भ्रष्टाचाराची २ प्रकरणे आहेत.
सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्ये
महाराष्ट्र – ७६३
उत्तर प्रदेश -२१६
हरयाणा – ३९
आसाम – ३१
जम्मू काश्मीर – २७
वाढता आलेख
२०२१- ७१५
२०२२- ६८८
२०२३ – ७६३
भ्रष्टाचारी शहरे
कोइम्बतूर -१६८
चेन्नई -१३२
पुणे -२८
नागपूर -१२
मुंबई -१२

