भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास ; २५ वर्षे हुलकावणी देणाऱ्या विश्वचषकावर कोरले भारताचे नाव
- भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा केला ५२ धावानी पराभव
- शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा विजयाच्या शिल्फकार
- दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लारा वुलफार्ट शतकी खेळी ठरली व्यर्थ
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत जेतेपद आपल्या नावे केलं.
दीप्ती शर्माच्या ४६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नादिन दे क्लार्क मोठा फटका खेळायला गेली आणि हरमनप्रीत कौरने मागे धावत जात व उडी मारत उत्कृष्ट झेल टिपला आणि विश्वविजेतेपदाचा जल्लोष सुरु झाल्याचा क्षण
भारताच्या विजयाच्या शिलेदार शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या. अंतिम सामन्यात शफालीने ८७ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या, तर दीप्तीने ५८ धावा केल्या, पाच विकेट्स घेतल्या आणि एका खेळाडूला रनआउटही केलं.
दीप्ती शर्माच्या ४६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नादिन दे क्लार्क मोठा फटका खेळायला गेली आणि हरमनप्रीत कौरने मागे धावत जात व उडी मारत उत्कृष्ट झेल टिपला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला. तर दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात पाच विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. हरमनने कमालीचा झेल टिपत मैदानावर हात पसरून धावत जात विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर संपूर्ण संघाने एकत्र येत आभाळाकडे फटाके वाजताना बोट दाखवत विजयाचा आनंद साजरा केला.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सदस्य रोहित शर्मा महिला क्रिकेट संघाने विश्वकषक जिंकल्यानंतर झाला भावुक तो क्षण

भारतीय संघ जिंकताच सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांनी एकमेकांना मिठी मारत प्रचंड भावुक झाल्या तर कोच अमोल मुझुमदारही रडताना दिसले. क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळेस भावुक होणारी स्मृती मानधना विश्वचषक जेतेपदावर भावुक झालेली दिसली आणि हरमनला मिठी मारून रडताना दिसली. भारताच्या विश्वचषक जेतेपद नावे केल्यानंतर जल्लोष करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.


