पिंपरी चिंचवड

टीका-टिपणीकडे दुर्लक्ष करा ; कामाला प्राधान्य द्या : वस्ताद किसनराव लांडगे(बाबा)

– महापौर रवी लांडगे यांना मोलाचा सल्ला 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच प्रभागाचा विकास करणे आवश्यक आहे. पद मिळाल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे करत रहाणे आवश्यक आहे. काम करताना टीका-टिपणी केली जाते. त्याकडे दुर्लक्ष करून कामालाच प्राधान्य द्या असा सल्ला भोसरी गावाचे वस्ताद आमदार महेशदादा यांचे वडील किसनराव लांडगे (बाबा) यांनी नवनिर्वाचित  महापौर रवी लांडगे यांना दिला.  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका २७ व्या महापौरपदी रवी बाबासाहेब लांडगे यांची शुक्रवारी (दिनांक ०६) बिनविरोध निवड झाली . या निवडीमध्ये आमदार महेशदादा लांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. महापौरपदी निवड झाल्यानंतर आमदार महेशदादा लांडगे यांच्या घरी नवनिर्वाचित महापौर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी वस्ताद किसनराव लांडगे (बाबा ) यांनी महापौर पदी निवड झाल्याबद्दल रवी लांडगे यांना फेटा बांधून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक कार्तिक लांडगे उपस्थित होते. 

  यावेळी बाबांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  कै. बाबासाहेब लांडगे,  कै. शंकरराव लांडगे आणि वस्ताद किसनराव लांडगे यांनी मिळून भोसरी गावठाण मधील बापुजी बुवा चौक येथे आझाद गणेश मित्र मंडळाची स्थापना केली होती. सर्वांची खूप जिवलग मैत्री होती, खुप जिद्दीने त्यावेळी एकत्र  येऊन मंडळ स्थापन केले. या आठवणी सांगताना बाबा भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले. वस्ताद किसनराव लांडगे बाबा यांना महापौर रवी लांडगे  यांनी  विश्वास देत शहराच्या विकासासाठी योगदान देणार असून आमदार महेशदादा यांच्यामुळे सर्व  लांडगे परिवार एकत्र झालेला आहे. त्यामुळे सर्वाना बरोबर घेऊन एकत्रित शहराच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देऊ असा विश्वास व्यक्त करीत वस्ताद किसनराव लांडगे यांचा आशीर्वाद घेतला.