स्वहीतापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणाऱ्या दिनेश यादव यांना स्वीकृत नगरसेवक करा
–आमदार महेश लांडगे यांच्याकडे युवकांतून होत आहे आग्रही मागणी
–भाजयुमो अनुसूचित जाती युवा मोर्चाने दिले निवेदन
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महानगपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १२८ पैकी ८४ जागेवर विजय मिळवित आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा महानगरपालिकेवर कमळ फुलविले. यामध्ये पक्षहितासाठी स्वतःची इच्छा बाजूला सारून पक्षाने जो आदेश दिला तसे काम केलेल्यामध्ये कुदळवाडी येथील पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमो चे अध्यक्ष दिनेश यादव यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत जे ०७ स्वीकृत नगरसेवक निवडण्यात येणार आहेत त्यामध्ये त्यांना नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशी मागणी शहरातील युवकांमध्ये आहे.
त्या अनुषंगाने भाजपा अनुसूचित जाती युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन उदागे, उपाध्यक्ष दत्ता कसबे, अमोल शेलार, सरचिटणीस अमर लोंढे यांनी आमदार महेशदादा लांडगे यांना निवेदन देत मागणी केली आहे. तसेच कुदळवाडी, प्रभाग क्रमांक ११, प्रभाग ०२ मधील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शहरातील भाजयुमो चे युवक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दिनेश यादव हे २०१७, २०२६ च्या महानगरपकलिका निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक होते. मात्र दोन्ही निवडणुकीच्या वेळी पक्ष हितासाठी त्यांनी माघार घेत स्वईच्छेला मुरड घालून पक्षाने दिलेले उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करीत आमदार महेशदादा यांनी जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी दिनेश यादव यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. २०२६ च्या निवडणुकी अगोदर सक्रिय सदस्य ३ हजार केल्यामुळे त्यांचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पात्र पाठवून अभिनंदन केले होते. तसेच ते राष्ट्रीय स्वयं संघांचे प्रथम वर्ग शिक्षित असल्याने ते भाजप च्या विचारधारेशी प्रामाणिक काम करणारा युवा पदाधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये दिनेश हे प्रभाग क्रमांक ११ मधून स्वतः तीव्र इच्छुक होते; मात्र पक्षाकडून महिला देण्यासाठी आदेश देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्नी यांना मैदानात उतरविण्याची तयारी केली. आमदार महेशदादा यांचे भाचे असून ही या भागात कामाचा माणूस अशी कामातून ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मनाला जात होता. मात्र पक्ष हिताला प्राधान्य देणारा पदाधिकारी असल्याने आणि आमदार महेशदादा यांनी पक्ष वाढीसाठी काही राजकीय निर्णय घेतल्यामुळे दिनेश यादव यांनी त्यांच्या पत्नीची उमेदवारी मागे घेत त्याठिकाणी दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्यासाठी घरातील उमेदवारी त्यांना दिली. आणि त्यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न ही केला आणि निवडूण आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.
तसेच प्रभाग क्रमांक ०२ मध्ये ही कुदळवाडी येथील सात हजार मतदान गेल्याने त्याठिकाणच्या भाजप उमेदवारांना ते मतदान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच भाजपने कुदळवाडी येथे केलेल्या अतिक्रमाण कारवाईत स्वतःच्या जागेतील बांधकामे बाजूला करून पक्षाच्या भूमिकेबरोबर राहण्याची भूमिका घेतली. याभागात मुस्लिम बहुल भाग असताना ही पक्षाच्या हितासाठी दिनेश यादव यांनी काम केले आहे. आता पक्षाच्या वतीने ०७ स्वीकृत नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त पक्षाच्या हिताचा विचार करणाऱ्या दिनेश यादव यांची निवड करून त्यांच्या कामाचा सन्मान करावा अशी मागणी युवा वर्गातून होत आहे.

