बातम्या

अटल सेतु येथे  हेलिपॅड आणि आपत्कालीन यंत्रणा उभा करा 

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याककडे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

एक्सप्रेसवेवरील नुकत्याच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. अशा घटना अटल सेतूवर घडल्यास समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर पत्र पाठविले.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोग‌द्यानजीक दि. ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी सायंकाळी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अति ज्वलनशील प्रोपोलिन गॅसचा टकर उलटल्यानंतर निर्माण झालेली अभूतपूर्व वाहनकोंडी ३६ तासांनंतरही कायम होती. टँकरमधील प्रोपलीन गॅसची गळती सुरु झाल्याने या महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे शेकडो वाहने या महामार्गावर अडकून पडली.

 महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांसह हजारो प्रवाशांचे अन्न पाण्यावाचून अतोनात हाल झाले. मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा (ताई) अजित (दादा) पवार यांना सांत्वनपर भेटीसाठी बारामतीला याच मार्गाने सकाळी १०.०० वाजता जात होतो. टँकरची परिस्थिती मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली होती. या घटनेमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आला अधोरेखित झाली आहे.

सदरहू घटनेच्या पार्श्वभूमीवर “अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु” (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL) या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाच्या आपतकालीन यंत्रणेचा आढावा घेण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील न्हावा शेवाला जोडणारा या पूलाची एकूण लांबी २१.८ किमी असून ज्यापैकी १६.५ किमी समुद्रभागात आणि ५.५ किमी लांबी जमिनीवर आहे. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी हा पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला असून मुंबई नवी मुंबई या दोन महानगरातील प्रवासाचा वेळ एका तासावरून अवघ्या २० मिनिटांवर आला आहे.

 त्यामुळे या पूलांवरील वाहनाच्या रहदारीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. तसेच या सेतूच्या नजीकच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे सदरहू सेतुवर कालच्या मुंबई पुणे दुर्घटनेसारख्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास किंवा मोठा अपघात, आग व अन्य नैसर्गिक आपती उ‌द्भवल्यास त्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे, हे एक मोठे आव्हान असू शकते. यास्तव “जटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतु” वर आपत्कालीन यंत्रणा, हेलिपॅडसारख्या सुविधा तातडीने उभारण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात यावेत, अशी विनंती विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.