कोल्हापूरक्रीडापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईसांगलीसातारा

भारताने पाकिस्तानला केले चारीमुंड्या चित 

-टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 

भारताने पाकिस्तानचा केला  ६१ धावानी पराभव  

भारतीय संघ सुपर ८ मध्ये 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

कोलोम्बो, प्रेमादास स्टेडियम येथे पार पडलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने इशान किशानच्या ७७ धावाच्या जोरावर  पाकिस्तान संघावर ६१ धावानी विजय प्राप्त केला. पाकिस्तान संघाला ११४ धावत गारद करीत  भारताने  सुपर ८ मध्ये दिमाखादार प्रवेश केला. 

कोलोम्बो येथील प्रेमदास स्टेडियमवर  रविवारी (दिनांक १५) टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघादरम्यान  सामना पार पडला. नाणेफेक जिंकून पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून खेळाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि इशान किसन ने केली. मात्र पहिल्याच षटकात ज्याच्याकडून मोठ्या खेळीच्या अपेक्षा होत्या तो अभिषेक शर्मा धावांचे खाते न खोलता शून्य धावावर बाद झाला. 

अभिषेक शर्माच्या जागेवर आलेल्या तिलक वर्मा खेळण्यासाठी मैदानात आला. तिलक ला साथीला घेऊन इशान ने भारताचा डाव सावराला. त्याने २७ चेंडूत ५० धावा केल्या. तिलकने इशानला चांगली साथ दिली. इशान मोठी खेळी करणार असे वाटत असताना इशान किशन ४० चेंडूत ७७ धावा करुन बाद झाला. त्याने तिलकला साथीला घेऊन दुसऱ्या गाड्यासाठी ८७ धावांची भागीदारी केली. 

इशान बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानावर उतरला. भारताने २० षटकात ७ गाडयांच्या मोबदल्यात १७५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ३२, तिलक वर्माने २४ चेंडूत २५, शुभम दुबेने १७ चेंडूत २७, रिंकू सिंगने ४ चेंडूत ११ धावाच्या जोरावर २० षटकात ७ गाड्यांच्या बदल्यात १७५ धावा केल्या. 

पाकिस्तान कडून साईमने ३(२५) तर सलमान, शाहीन, तारीफ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. भारतीय संघाच्या ७ बाद १७५ धावाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ ही पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे गडगडला. १४ षटकापर्यंत पाकिस्तानचा डाव ७ बाद ८९ धावा केल्या. यामध्ये भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीची सुरुवात केली. साहिबाजादा ला शून्यावर परत पाठविले. दुसरे षटक जसप्रीत बुमराह ने दोन गडी बाद केले. साईम आयुब आणि कर्णधार सलमान आली आगाला बाद करुन पाकिस्तान संघाला मोठा धक्का दिला. 

त्यानंतर गोलदाजीला आलेल्या अक्षर पटेल ने बाबर आझमला बाद केले. पाकिस्तान संघ १० षटकात ४ बाद ७१ अशी झाली. उस्मान खान ४४ धावावर खेळत होता. तो पाकिस्तान ला मोठी खेळी करणार असे वाटत असताना अक्षर पटेल ने आपल्या चौथ्या षटकात फिरकीवर माघारी धाडले. सातवा गडी तिलक वर्मा ने माघारी पाठविला. भारताकडून जसप्रीत, हार्दिक, अक्षर, वरुण ने प्रत्येकी २ तर कुलदीप ने १ गडी बाद करीत पाकिस्तान संघाला ११४ धावत गाराद केले. ईशान किशान ला सामन्यातील सर्वोत्तम खेळूडू म्हणून घोषित करण्यात आले.