पिंपरी चिंचवडपुणे

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास निधी आणि गती द्या 

  • नगरसेवक राहुल कलाटे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरातील पाणीटंचाई विषय अत्यंत गंभीर होत चलला आहे. त्याचा फायदा टँकर लॉबी उठवीतना दिसत आहे. त्यांच्या विरोधात शहरवासियांमध्ये   नाराजीचा सूर उमटला आहे. या  प्रकल्पास गती मिळाल्यास पिंपरी-चिंचवडकरांना पाण्याबाबत मोठा दिलासा मिळेल. तसेच शहरातील  पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम व नियमित होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने पवना बंदिस्त  जलवाहिनी प्रकल्पास निधी देऊन गती द्यावी  असे साकडे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी  प्रत्यक्ष भेटून घातले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पवना बंदिस्त जलवाहिनी  योजनेसाठीचे ९०% भूसंपादन पूर्ण झाले आहे.  त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र एकूण रकमेच्या २५% तरतूद नसेल तर पुन्हा निविदा काढण्यासाठी अडथळा होऊ शकतो. त्याबाबतची सविस्तर  वस्तुथिती  महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मंडल्याचे प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत त्याअनुषंगाने नगरसेवक कलाटे यांनी  प्रत्यक्षात भेटून निवेदन दिल

 पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून रोज जवळपास पाचशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येणारे हे पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या पद्धतीमुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होते.त्यात  प्रदूषित पाणी मिसळते. त्याचा  पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतोय. 

पवना बंदिस्त जलवाहिनी  प्रकल्पामुळे अंदाजे १०० दशलक्ष लिटर  पाण्याची बचत होणार आहे.  तेवढे अतिरिक्त  पिण्याचे  पाणी  शहराला उपलब्ध होणार आहे.  मात्र गेली १५ वर्ष हा प्रकल्प प्रलंबित राहिल्याने प्रकल्पाचा खर्च  ३०० वरून १ हजार २५६ कोटी रुपयांवर  पोहचला आहे. त्यामुळे शासन पातळीवर आपण याकडे जातीने  लक्ष घालून निधीची तरतूद तातडीने करावी आणि प्रकल्पाला गती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

—————————–