मनोज जरांगे आणि बारसकर महाराजांचा वाद हा वैयक्तिक, त्यात सरकारचा काडीमात्र संबध नाही – मंत्री उदय सामंत
मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकारला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मराठा समाजाला शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारने टिकणारे आरक्षण दिले. तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत हे आरक्षण दिल्याचे उदय सामंत म्हणाले. पुण्यामध्ये इंडिया आघाडीच्या मेळाव्यावर बोलताना इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा, असे सामंत यांनी आव्हान केले. दरम्यान, गुजरातमध्ये महानंदा डेअरी जाणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी बोलण्यास नकार दिला.