पिंपरी चिंचवड

अकार्यक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज्य आणि देशातील विविध अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात उतरला रस्त्यावर

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्यांवर झालेला अत्याचारा, कलकत्ता येथील महिला डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचारा विरोधात व उरण येथे घडलेल्या हत्याकांडा विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा तसेच निषेधाची स्वाक्षरी अभियान आंदोलन करण्यात आले.

हे निषेध आंदोलन संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालया समोर करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे, गणेश भोंडवे, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियंका बारसे, विनायक रणसुभे, नंदकुमार शिंदे तसेच डॉक्टर अभय तांबिले, संतोष कवडे, प्रशांत सपकाळ, कविता कोंडे, अनिल भोसले, संदीप चव्हाण, गणेश काळे, सागर चिंचवडे, संजय पडवळ , धम्मराज साळवे, श्रीमंत जगताप , हेमंत बलकवडे, वंदना आराख, मनीषा शेळके , मोहम्मद सय्यद, लता सूर्यवंशी, राजेश रोजचीरामणी, सचिन गायकवाड, गणेश भांडवलकर, काशिनाथ जगताप व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी “अकार्यक्षम गृहमंत्री हे पक्ष, घर फोडण्यासह संपूर्ण वेळ प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना गांभीर्य उरलेले दिसून येत नाही अशी टीका केली. कधी नव्हे तो एवढा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाला संपूर्ण वेळ सरकारी खर्चावर चाललेल्या प्रचारासाठी सत्तेतील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम दिले आहे.” त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने याची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.