राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवारांना जाहीर; छगन भुजबळ नाराज : साताऱ्याचे नितीन पाटील यांना दिलेल्या शब्दाचे काय ?
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दिकी यांच्या नावाची होती चर्चा
- सातारातून लोकसभेला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील होते तीव्र इच्छूक
- उदयन राजे भोसले यांना निवडून आणा नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवितो असा शब्द अजितदादा यांनी भर सभेत दिला होता
- आता त्या शब्दाचे काय ?
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी बारामती लोकसभा मतदार संघातून पराभव पत्करावा लागलेल्या सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. त्या आज त्याअनुषंगाने त्या अर्ज दाखल करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून छगन भुजबळ हे ही तीव्र इच्छुक होते. सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाल्यामुळे भुजबळ हे नाराज असल्याचे वृत्त आहे. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यसभेवर पाठवितो असा शब्द दिला होता. त्या शब्दाचे काय ? अशी चर्चा सातारा सह वाई विधानसभा मतदार संघात आहे.
देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा अजितदादा पवार असा सामना रंगला होता. त्यामध्ये काका शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वरचढ जात सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी जवळपास दीड लाख मताने दणदणीत पराभव केला. अजित पवार गटाचा ४ पैकी फक्त एकच खासदार सुनील तटकरे यांच्या रूपाने निवडून आला. तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे १० पैकी ०८ खासदार निवडून आल्याने शरद पवार यांच्याच भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरते हे सिद्ध झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये एका अपक्षासह महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवित महायुतीवर दणदणीत मात केली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता प्रस्थापित केली. त्यामध्ये महाराष्ट्रात सहा मंत्री देण्यात आले आहेत. त्यापैकी दोन कॅबिनेट आणि चार राज्य मंत्री देण्यात आले आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या खासदारांचा समावेश आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिले तर कॅबिनेट मंत्री पद द्या अन्यथा नंतरच्या विस्तारत द्या अशी मागणी करीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या या निर्णयामुळे रालोआ त चर्चेचा विषय आहे.
त्यात आता सुनेत्रा पवार या राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. त्या बिनविरोध निवडून येणारं हे नक्की आहे. त्या राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला असल्याने अजितदादा पवार गटात आणि बारामती मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात येत असल्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
जून मध्ये नितीन काका ला खासदार नाही केला तर पवारांची औलाद म्हणून नाव नाही सांगणार : अजितदादा यांची वाई च्या सभेतील गर्जना..
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दिकी आणि पार्थ पवार यांची नावे चर्चेत होतीच तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना निश्चित खासदार करण्यात येईल असा शब्द खुद्द अजितदादा पवार यांनी सातारा मध्ये झालेल्या सभेत दिला होता. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी कशी काढणार व छत्रपती उदयन राजे भोसले यांना निवडून आणा साताऱ्यात नितीन पाटील यांच्या रूपातून राज्यसभेवर संधी देण्यात येईल असा जो विश्वास व्यक्त केला होता त्या विश्वासाचे काय असा प्रश्न सातारा आणि वाई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे.