भारत विश्वविजेता
- नाणेफेक जिंकून भारताने घेतली फलंदाजी
- विराट कोहली महत्वाच्या सामन्यात केल्या ७६ धावा
- अक्षर पटेल, शुभम दुबेची विराटबरोबर संघासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी
- दक्षिण आफ्रिका क्लासेन ने २४ चेंडूत ५१ धावा केल्या
- सूर्यकुमार यादवच्या सीमा रेषेवरील अप्रतिम झेलामुळे विजय झाला सुकर
- हार्दिक पांड्या ३, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी २ तर अक्षर पटेलने बाद केला १ गडी बाद
- विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू झाले भावनिक
- प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारतीय संघाने विश्वचषक जिंकून मोठी भेट
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
दक्षिण आफ्रिकेवर विश्वविजेता विजय मिळताच भारतीय क्रिकेट संघाने मिळविल्यानंतर भारताचा तिरंगा मोठ्या दिमाखात फडकताना
सूर्यकुमार यादव याने डेव्हिड मिलर चा सीमा रेषेवर पकडलेला अप्रतिम झेल, विराट कोहली ची ७६ धावांची खेळी आणि हार्दिक पांड्या, अर्शदिप, जसप्रीत बुमराह यांची उत्कृष्ठ गोलंदाजीच्या जोरावर भारताने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावलेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावानी विजय मिळवित टी ट्वेण्टी विश्वचषक उंचाविला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह सर्वच खेळाडूच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले . भारतीय संघाने प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रशिक्षक पदावरून निवृत्तीचे मोठी भेट दिल्याने ते ही भावनिक झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्विजेतेपद मिळविलेल्या भारतीय क्रिकेट संघाला विशेष शुभेच्छा देताना
सूर्यकुमार यादव याने सीमा रेषेवरील डेव्हिड मिलर चा अप्रतिम झेल पकडला आणि भारतभर जल्लोष सुरू झाला. सूर्यकुमार यादव याचा जल्लोष
तेरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्र्वचषक विजेतेपद पटकाविल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा जल्लोष करताना
टी ट्वेण्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२४ च्या अंतिम सामन्यात पहिल्या सामान्यांपासून अपराजित राहिलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शनिवार (दिनांक २९) बार्बाडोस मधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर अंतिम सामना रंगला आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू झाले भावनिक
पहिल्या षटकात विराट कोहलीने दुसऱ्या, तिसऱ्या व सहाव्या चेंडूवर चौकार मारत चार चेंडूत १३ धावा करीत आपला इरादा स्पष्ट केला. दुसऱ्या षटकात रोहीत ने केशव महाराज ला सलग दोन चौकार मारले. आणि तिसऱ्या चेंडूवर केशव महाराज ने रोहितला झेल देण्यास भाग पाडले. तो ०९ धावा करून बाद झाला.
रोहित च्या जागेवर यष्टीरक्षक ऋषभ पंत मैदानात उतरला. केशव महाराज ने पाचव्या चेंडूवर पंतला यष्टिरक्षक करवी झेलबाद करीत केशव महराजने भारताचे दोन गडी तंबूत पाठविले. पंत च्या जागेवर सूर्यकुमार मैदानात उतरला आहे. चौथ्या षटकात रबाडाने सूर्यकुमार यादवला सीमारेषा जवळ झेल देण्यास भाग पडल्याने पॉवरप्ले मध्येच भारताचे तीन गडी परत पाठविण्यास दक्षिण आफ्रिका संघाला यश आले.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केली होती निवृत्तीची घोषणा; संघाने विश्वचषक जिंकून भारतीय संघातील खेळाडू यांनी दिली प्रशिक्षक यांना यादगार भेट
पॉवर प्लेच्या सहा षटकात भारताने ३ गाड्यांचा मोबदल्यात ४५ धावा करण्यात यश आले आहे. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर अक्षर पटेल कोहिली याला साथ देण्यास मैदानात उतरला . सातव्या षटकात विराट कोहलीने २७ तर अक्षर पटेल याने ०९ धावा केल्या आहेत.
दहा षटके झाल्यानंतर भारताची धावसंख्या ३ गाड्यांचा मोबदल्यात ७५ धावा झाल्या होत्या. त्यामध्ये विराट कोहली ३६ (२९ चेंडूत) तर अक्षर पटेल २७ (२१ चेंडूत) धावावर खेळत आहे. पॉवर प्ले मध्येच तीन गडी गमावून ही भारताने आपली धावगती ८ च्या जवळ ठेवण्यात विराट आणि अक्षरने यश मिळविले आहे.
भारताकडून विराट आणि अक्षरंने तीन गडी बाद झाल्यानंतर तेराव्या षटकापर्यंत ५३ चेंडूत ६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. अक्षर पटेल ने षटकार मारत १३.१ षटकात भारताच्या १०४ धावा धाव फलकांवर झलकविल्या. अक्षरने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या त्यात उत्कृष्ट चार षटकारांचा समावेश आहे. दरम्यान धाव घेण्याचा नादात विराट आणि अक्षर यांच्यात ताळमेळ विस्कटल्यामुळे अक्षर धावबाद झाला. त्याने संघासाठी अडचणीच्या काळात महत्त्वाची ४७ धावांची खेळी (३१ चेंडूत) केली.
अक्षर धावबाद झालंयानंतर शुभम दुबे मैदानात उतरला. त्याने यैंसनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्याने आपले इरादे जाहीर केले. विराटने अंतिम सामन्यात टी ट्वेण्टी विश्वचषक २०२४ मधील पाहिले अर्ध शतक ४८ चेंडूत १७ व्या षतकात पूर्ण केले. अर्ध शतक झाल्यानंतर १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर २ आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. १८ व्या षटकात भारताने ४ गाड्यांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या. १९ व्या षटकात पहिल्या चेंडूवर विराट झेलबाद झाला होता; परंतु तो बॉल नो बॉल असल्याचे पंचांनी जाहीर केले. त्यानंतर विराट ने फ्री चेंडूवर चौकार मारला.
विराट आणि शुभम दुबे यांच्यामध्ये ५६ धावांची भागीदारी झाली . १८.५ चेंडूवर विराट कोहलीला यैंसानने राबडा कडे झेल देण्यास भाग पाडले. विराट ७६ धावावर (५६ चेंडूत ) बाद झाला. त्याच्या जागेवर हार्दिक पांड्या आला. त्याने येताच चौकार मारला. शुभम दुबे २७ धावा (१७ चेंडूत) करून नॉरखिये ने बाद केले. भारतीय संघाने २० षटकात ७ गाड्यांचा मोबदल्यात १७६ धावा केल्या.
भारताने दक्षिण आफ्रिकेला २० षटकात १७७ धावांचे लक्ष दिले आहे. भारताने दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना डी कॉक आणि हेंड्रिक्स यांनी सुरुवात केली. भारताकडून गोलंदाजी अर्शदीपने सुरुवात केली असून ७ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने रिजा हेंड्रिक्सचा त्रिफळा उडवीत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर आऊट स्विंगवर पहिला धक्का दिला. दक्षिण आफ्रिका दोन षतकात १ बाद ११ धावा झाल्या आहेत. हेंड्रिक्स च्या जागेवर कर्णधार हेडन मारक्रम आला.
त्याला अर्शदीपने यष्टीरक्षक ऋषभ पंत कडे झेल देण्यास भाग पाडले. तिसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेची आवस्था २ बाद १२ अशी झाली आहे. मारक्रम च्या जागेवर स्ट्रिस्टन स्टब्स आला आहे. स्टब्स आणि डी कॉक यांच्यात अर्ध शतकी भागीदारी झाली. त्यानंतर ९ षटकात अक्षर पटेल याने स्टब्सला त्रिफळाचित केले.
दक्षिण आफ्रिकेने ९ षटकात ३ गाड्यांचा मोबदल्यात ७१ धावा केल्या. स्टब्स च्या जागेवर क्लासेन मैदानात उतरला आहे. दहा षटकात भारताने ३ गाड्यांचा मोबदल्यात ७५ तर दक्षिण आफ्रिकेने ३ गाड्यांचा मोबदल्यात ८१ धावा केल्या आहेत. डी कॉक आणि कलासेन यांच्यात धावांची भागीदारी केली.
अर्शदीपने भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या डी कॉकला ३९ धावावर कुलदीपकडे झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला. डी कॉक च्या जागेवर डेव्हिड मिलर खेळण्यास मैदानावर उतरला आहे. क्लासेन २४ चेंडूत ५१ धावा पूर्ण केल्या. हार्दिकने क्लासेनला पंत कडे झेल देण्यास भाग पाडत दक्षिण आफ्रिकेची पाचवा गडी बाद करीत भारताला पुन्हा सामन्यात परत आणले. क्लासेन ५२ धावावर बाद झाला.
१८ व्या षटकात जसप्रीतने यैंसनला त्रिफळाचीत करीत आफ्रेकीची सहावा गडी तंबूत पाठविला. या षटकाअखेर अफ्रिका ६ बाद १५७ धावा केल्या. केशव महाराज यैंसन च्या जागेवर खेळण्यासाठी आला आहे. दक्षिण आफ्रिकेला २० व्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने सीमारेषा पार करणार फटका मारला होता ; परंतु यावर अप्रतिम झेल सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने पकडला. त्याजोरावर भारताने ७ धावांनी टी ट्वेण्टी विश्वचषक जिंकला आणि भारतभर दिवाळी साजरी करण्यात आली.