महाराष्ट्र

कामगार ते १२० कोटी रुपयांची वार्षिक उलढाल करणारे उद्योजक राजेंद्र जगताप यांची उद्योग क्षेत्रात  गरुडझेप 

  • स्वतःच्या कंपनीचे मालक होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग ; २० वर्षे संघर्षातून स्वप्न उतरविले सत्यात

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।

ज्या वयात खऱ्या अर्थाने  शिक्षणाचा पाया रचला जातो त्या वयात घरच्या आर्थिक बेताच्या परिस्थितीमुळे गाव सोडून भोसरीत एका कारखान्यात कामगार म्हणून काम सुरू केले. मात्र शिक्षणाची आवड आणि आपण ज्या क्षेत्रात काम करत आहे त्याचे परिपूर्ण शिक्षण घेण्याची प्रचंड महत्वकांक्षा पोटी नोकरी करत   आयटीआय चे शिक्षण पूर्ण केले. आपण एक दिवस कंपनीचे मालक व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी रात्रणदिवस कष्ट केले. २० वर्षच्या  मेहनतीला यश येऊ कामगार ते १२० कोटी चीं वार्षिक उलाढाल करणारे उद्योजक राजेंद्र रामदास जगताप यांची गरुडझेप उद्योग क्षेत्राला  कंपनीचा मालक हा प्रवास खरंच थक्क करणारा असून या  यशस्वी उद्योजकचे नाव आहे राजेंद्र रामदास जगताप.

   नाशिक जिल्ह्यातील जायखेडा गाव तालुका सटाणा. आई-वडील शेतकरी. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शेतकरी माता-पित्याला शेतीत मदत करून दहावी पर्यंतचे शिक्षण जायखेडयात पूर्ण केलं. घरी एकत्र कुटुंब. त्यामुळे दहावी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर   व आई-वडिलांची परिस्थिती जाणीव असल्याने भोसरीत मोठे बंधूकडे  कामानिमित्त जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा ही संसार दहा बाय दहा च्या खोलीत सुरू होता. याची जाणीव ठेवून फक्त काम आणि काम यावर विश्वास ठेवून एक कंपनीत कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. परंतु आपल्याला आयुष्यभर कामगार म्हणून राहायचे नाही तर आपण जसे आता एक कंपनीत काम करतोय , त्यामध्ये शेकडो कामगार काम करतायत त्या प्रमाणे आपण ही एक दिवस स्वतःची कंपनी सुरू करायची, त्यामध्ये गरजवंतांना नोकरी देण्याचे काम करायचे हे स्वप्न गप्प बसून देत नव्हतं. 

   काम करत पार्ट टाईम आयटीआय केला. दोन वर्षे भोसरी ते औंध असा प्रवास केला. जवळ वाहन नव्हतं, त्यामुळे नोकरी आणि आयटीआय चे शिक्षण या दरम्यान मोठी कसरत करावी लागत होती. पण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करायची जिद्दी मुळे आयटीआय शिक्षण पूर्ण केले.  जीवन यशस्वी करायचे असतील तर आई-वडिलांच्या नंतर चांगले मित्र असणे आवश्यक असते. त्या काळात चार-पाच मित्र मिळाले होते.  तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर टाटा मोटर्समुळे  खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याठिकाणी मिळालेल्या मित्रामुळे काम करण्याची प्रेरणा मिळली. परंतु स्वतःची कंपनी सुरू करण्याचे ध्येय गप्प बसून देत नव्हते. 

  २००२ मध्ये खडतर जीवनाची पुंजी व मित्रांच्या मदतीने धनश्री एंटरप्राइज नावाने कम्पनी सुरू केली. पहिले काही वर्षे छोट्या-छोट्या चार ते पाच कंपन्या चे काम मिळाले. कामा प्रति असणारी तळमळ, दिलेल्या वेळेत या त्याच्या अगोदर क्यलिटीत कोणतीच अडजेस्टमेंट न करता ऑर्डर पूर्ण करून देण्याचा सवयीमुळे मला कामे मिळत गेली. आजमितीस महाराष्ट्रातील नामवंत कंपन्यांबरोबरच परदेशी कंपन्याचे काम माझ्याकडे आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व धनश्री एंटरप्राइज ला आहे. आज माझ्याकडे १५० कामगार काम करतात. वर्षाला १२० कोटी वार्षिक उलढाल  आहे. भविष्यात ती २०० कोटी करण्याबरोबर अत्याधुनिकेतेची कास धरत प्रामाणिकपणा, सचोटी आणी कामाच्या दर्जाला महत्व देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या ध्येयवेड्या उद्योजकांचे नाव आहे राजेंद्र रामदास जगताप. त्यांच्या भविष्यातील योजना आणि महत्वकांक्षा पूर्ण व्हाव्यात या शुभेच्छा..!