विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा १०० टक्के विजयी स्ट्राईक रेट ; पंकजा मुंडे यांचे राज्याच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री
- ०९ पैकी ०९ जागेवर विजय
- भाजपचे पाच ही उमेदवारांना पहिल्या पसंदीची २६ मते घेत विजयी
- एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी
- महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्या पसंदीची २५ मते घेवून विजयी
- शिवसेना उबाटा गटाचे मिलिंद नार्वेकर पहिल्या पसंदीची घेतली २२ तर दुसऱ्या पसंदीची ०३ असे २५ मते घेवून विजयी
- शरद पवार गटाकडून पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील पराभूत
- महाविकासाघडी चे तीन पैकी ०२ उमेदवार विजयी
लोकमान्य टाइम्स : मुंबई
विधान परिषद निवडणुकीत महायुतीने १०० टक्के स्ट्राईक रेट ठेवत ०९ पैकी ०९ जागेवर विजय प्राप्त केला. तर महाविकास आघाडी ने ०३ पैकी ०२ जागेवर विजय मिळविला. परंतु राजकारणातील वस्ताद अशी ओळख असलेले शरद पवार यांनी पुरस्कृत केलेल्या शेकाप पक्षाचे जयंत पाटील यांनी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचीच १२ मते मिळाली. इतर मतांची त्यांना जुळवाजुळव करता न आल्यामुळे त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहेत. या विजयामध्ये सर्वात ठळकपणे जो विजय होता तो पंकजा मुंडे यांचा. त्यांचा २०१९ पासून सुरू झालेला राजकीय वनवास या विजयामुळे संपल्याचे दिसत आहे.
महायुतीकडून जे उमेदवार रिंगणात उतरले होते त्यामध्ये भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे , परीणय फुके आणि सदाशिव खोत यांना २६ मते मिळाली आहेत. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर २५, शिवाजीराव गर्जे २४ तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी २४, कृपाल तूमाने २५ मते घेवून विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी २५, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना २५ ( पहिल्या पसंदी २२ आणि दुसऱ्या पसंदीची ०३ ) मते घेवून विजय झाले आहेत. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार शेकाप जयंत पाटील यांना फक्त १२ मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठीची मते घेण्यातते अयशस्वी झाले आहेत.