पिंपरी चिंचवडराजकीय

पिंपरी विधानसभेत महायुतीत अखेर दिलजमाई ; श्रेवादासाठी चढाओढ ; मात्र खरे सूत्रधार वेगळेच अशी चर्चा?

  • अण्णा बनसोड यांचा विजय झाला सुकर
  • सिंधी समाज करणार आमदार बनसोडे यांचे काम
  • उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली देवगिरीवर बैठक
  • श्रीचंद असवानी डब्बू उर्फ हिरानंद आसवानी, शितल शिंदे, चेतन घुले ,प्रसाद शेट्टी , काळूराम पवार, योगेश बहल उपस्थित
  • सिंधी समाजाला सर्वोतोपरी मदत करण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आदेश
  • पार्थ पवार यांनी शितल उर्फ विजय शिंदे , प्रसाद शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट
  • श्रीचंद आसवानी यांच्या निवासस्थानी भोजनानिमित भेट देत केली होती सविस्तर चर्चा

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

अखेर पिंपरी विधानसभा मतदार संघात महायुतीतील घटक पक्षात दिलजमाई करण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यश आले आहे. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांचा विजय सुकर झाला आहे. ही दिलजमाई करण्याचे काही जण श्रेय घेत असेल तरी यांच्या पाठी मागचे खरे सुत्रधार हे वेगळेच असल्याचे समोर आले असून ते नेमके कोण याची पिंपरी विधानसभेत जोरदार चर्चा रंगली आहे.

महायुतीकडून पिंपरी विधानसभेची उमेदवारी अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु ही उमेदवारी मिळावी म्हणून महायुतीच्या घटक पक्षापैकी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार होते. विद्यमान आमदार यांच्या कार्यप्रणालीवर पिंपरीतील सिंधी समाज यांच्या बरोबर महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी ही नाराज होता अशी चर्चा ही होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इतर इच्छुक ही प्रयत्न करत होते. सिंधी समाजाचं नाराज असल्याने आमदार बनसोडे यांना उमेदवारी मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता ; मात्र या या सर्व चर्चा वर विजय मिळवीत अण्णा बनसोडे यांच्यावर अजितदादा पवार यांनी विश्वास व्यक्त करीत महायुतीची उमेदवारी दिली.

काही झाले तरी अण्णा बनसोडे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी अजितदादा पवार यांनी कंबर कसली. भाजपचे प्रमुख इच्छुक असणाऱ्या अमित गोरखे यांना विधान परिषदेवर आमदार केल्यामुळे बनसोडे यांच्या उमेदवारीची फक्त घोषण होणे बाकी होते. मात्र त्या दरम्यान स्थायीच्या माजी अध्यक्षा यांनी पिंपरी विधानसभेतील नाराजांची मोट बांधून जोरदार तयारी केली होती. त्यामुळे जर इतर समाजाबरोबर सिंधी समाज बरोबर नसेल तर उमेदवारी मिळून ही विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार हे राजकारणी अण्णा बनसोडे यांनी हेरले होते.

त्याअनुषंगाने पार्थ पवार यांनी पिंपरी विधानसभेतील कल काय आहे याची माहिती घेतली. काही झाले तरी बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षात प्रमुख असणाऱ्या भाजप पदाधिकारी यांच्याशी बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये सिंधी समाज बरोबर घेण्यासाठी काय करावे लागेल याबाबत भाजप सरचिटणीस, माजी नगरसेवक शितल शिंदे व माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पिंपरीतील महायुतीचे सर्व माजी नगरसेवक आणि सिंधी समाज एकत्रित करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या लागतील याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर श्रीचंद आसवानी यांच्या घरी भोजन करत ही संधी समाजाच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यानंतर सिंधी समाजाचे म्हणणे ऐकून घेत देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीचंद असवानी , डब्बू उर्फ हिरानंद आसवानी , शितल उर्फ विजय शिंदे ,चेतन घुले , प्रसाद शेट्टी, काळूराम पवार, योगेश बहल यांच्याशी बराच काळ सविस्तर चर्चा केली. यावेळी सिंधी समाजाने ज्या समस्या आहेत त्याबाबत अजितदादा यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली, त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, आल्या तर सरळ मला संपर्क करा असे म्हणत मनातील सर्व रुसवे फुगवे बाजूला ठेवून अण्णा बनसोडे यांना विजयी करा असे आवाहन अजितदादा यांनी केल्याने आणि सर्व अडीअडचणीच्या निकरण झाल्याने अजितदादा यांनी टाकलेला शब्द प्रमाण मानून आमदार बनसोडे यांना पुन्हा आमदार करण्याचे सर्वांनी सकारात्मक चर्चा केल्यामुळे अण्णा बनसोडे यांचा विजय सुकर झाल्याची चर्चा पिंपरी विधानसभा मतदार संघात रंगली आहे.