पिंपरी चिंचवड

झिरो बॉईज चौकातील साई प्लाझा च्या भिंतीवर शेजारील भिंत कोसळल्याने मोठे नुकसान

साई प्लाझा इमारतीतील वाहनतळावर शेजारच्या इमारतीची भिंत कोसळली

चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

नेहरुनगर , पिंपरी येथील झिरो बॉईज चौकातील साई प्लाझा इमारतीच्या भिंतीवर शेजारी असणाऱ्या इमारतीची भिंत बुधवारी (दिनांक २४) दुपारी दीड वाजता कोसळली . साई प्लाझा भिंती शेजारी लावण्यात आलेल्या चार आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. यामुळे या इमारतीमधील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

सतत सुरू असणाऱ्या संततधारेमुळे ही भिंत कोसळली असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी यांनी व्यक्त केला आहे . या भिंती खाली साई प्लाझा इमारतीच्याच्या शेजारी पार्क केलेल्या वाहनांच्यावर भिंत कोसळल्यामुळे या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या कोसळलेल्या भिंतिखली कोणी अडखले आहे की नाही ? हे पाहण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या सर्व घटनेत नुकसान झालेल्या वाहनांची नुकसान भरपाई कोण देणार ?याबाबत संबंधित रहिवाशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसत होती.