मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर नतमस्तक
- जुन्नर येथे होणार आंदोलकांना मार्गदर्शन
- जुन्नर, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईकडे मोर्चाची होणार कुच
- जागोजागी जोरदार स्वागत
- वाहतूकीत बद्दल
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
मनोज जरांगे पाटील आज (गुरुवारी दिनांक २८) सकाळी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म स्थळाचे दर्शन घेऊन जुन्नरमध्ये मुख्य सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आज उशीरा दुपारी जुन्नरमधून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे जातील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मराठा आंदोलक हे वाट पाहत आहे
२८ ऑगस्ट रोजी सकाळी किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. हा मोर्चा चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशी मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. या दिवशी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित राहतील. येथे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे आपली मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात येईल. हा मोर्चा शांततापूर्ण मार्गाने व्हावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरावर या मोर्चाचा परिणाम दिसून येईल.
मनोज जरांगेंचा ताफा मुंबईच्या दिशेने निघण्याआधीच शासनाकडून त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होऊ शकतात. जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी मिळाली असून आझाद मैदानात ते २९ तारखेला पाच हजार लोकांसह सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत आंदोलन करु शकतात. मात्र, जरांगेंना ही अट मान्य नसून एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत मराठे आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून आज पावलं उचलले जाण्याची शक्यता आहे.
वाहतूकीत बद्दल : वाहचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे
जरांगे पाटील यांच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-नाशिक महामार्गासह पुणे – मुंबई मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पाल करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.वाहतुकीत बद्दल पुढील प्रमाणे
नारायणगावहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अष्टविनायक महामार्गावरून शिक्रापूरमार्गे वळवण्यात आली आहे. तर मंचर आणि खेडमधून पुण्याकडे जाणारी वाहतूक पाबळमार्गे शिक्रापूरकडे वळवली जाणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी देखील जुन्या मार्गाऐवजी पर्यायी नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाहतुकीतील या बदलांसंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले असून मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

