महाविकास आघाडीत कोण बनतय..? झारीतील शुक्राचार्य
- घटका पक्षात उमेदवारीवरून अंतर्गत वाद
- उमेदवारीसाठी उबाठा गट आक्रमक
- भोसरीत तुतारी ला उमेदवारी मिळाली तर काम करणार नाही ? कार्यकर्त्यांच्या खांद्यावर कोण ठेवतय बंदूक
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उबाठा गटातील एकित बेकी करण्यासाठी बाहेरील मतदारसंघातून रसद ची चर्चा
- शिवसेना (उबाठा गट ) कार्यकर्ते गोंधळात
- महाविकास आघाडीतील वरिष्ठ लक्ष देणार का ?
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या आठवड्याभारत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्या राज्यभर महाविकास आघाडीची हवा आहे .(विविध सर्व्हे, राजकीय विश्लेषक यांचे अंदाज वरून) प्रत्येक पक्ष उमेदवारी अंतिम करण्याच्या चढाओढीत दंग आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी, विविध छोटे मोठे पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे ; परंतु महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी तील घटक पक्षात उमेदवारीवरून चढाओढ सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार म्हणून विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांची उमेदवारी अंतिम आहे.
परंतु महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना उध्दव ठाकरे (उबाठा) गटात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून अजून ही खल सुरू आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एकमेव अजित भाऊ गव्हाणे हे तुतारी चिन्हावर तर उबाठा गटाकडून रवी लांडगे आणि सुलभा उबाळे हे मशाल चिन्हावर इच्छूक आहेत. काही झाले तरी यावेळी महायुतीच्या उमेदवाराला रोखण्यासाठी महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अभी नहीं तो कभी नहीं म्हणत महाविकास आघाडीने कंबर कसली आहे .
उमेदवारीसाठी इच्छूक असणाऱ्या पैकी कोणाला ही उमेदवारी मिळू द्या ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे महाविकास आघडीतील इतर इच्छुकानी प्रामाणिकपणे काम करायचे असे वेळोवेळी जाहीर केले जात असले तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटातील बैठकीत काही मोजक्या हाताच्या बोटावर मोजण्या येवढ्या कार्यकर्त्यांनी तुतारी चीन्हावर उमेदवारी दिली तर त्यांचे काम करायचे नाही ? असा पवित्रा घेतला आहे. हे जरी खरे असले तरी उबाठा गटाच्या बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र काही झाले तरी महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केल्याचे समजते. त्यामुळे मशाल किंवा तुतारी कोणाला ही उमेदवारी मिळू दे मिशन फक्त महायुतीच्या उमेदवाराचा पराभव हे एकमेव ध्येय निश्चित केल्याच्या बोलले जात आहे.
तुतारी ला उमेदवारी मिळाली तरी त्यांचे काम करायचे नाही असे म्हणत कार्यकर्त्यांच्या खांदयावर बंदूक ठेवत महाविकास आघाडीमध्ये कोण बनतय झारीतील शुक्राचार्य..? अशी चर्चा मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. एकमेकाच्या शह काटशहच्या राजकरणात प्रामाणिक कार्यकर्त्यात मात्र गोंधळ आणि चलबिचल वाढीस लागली आहे. त्यामुळे महाविकस आघाडीचे वरिष्ठ या अंतर्गत गोंधळाकडे लक्ष देणार का ? का ये रे माझ्या मागल्या अशी परस्थिती पुन्हा निर्माण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.