‘ चिंचवड ‘ महायुतीत वरूनच फक्त अलबेल..? अंतर्गत धोकेबाजी होऊ शकतेची चर्चा
- उमेदवार यांच्याकडून स्थानिकांना महत्व
- अंतर्गत नाराजीमुळे धोकेबाजी होण्याची मतदारसंघात चर्चा
- योगींच्या बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेला महायुतीतील घटक पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांचाच विरोध
- महायुतीतील घटक पक्षात या भूमिकेमुळे चलबिचल
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे असे वातावरण निर्माण करण्यात येत असेल तरी युतीतील घटक पक्षातील महत्वकांक्षी नेत्यांमुळे काही घोषणेवर एकमत होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बतेंगे तो कटेंगे अशी घोषणा करीत हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे; परंतु हे विधान उत्तर प्रदेशात चालते , मात्र महाराष्ट्रात नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार मत व्यक्त केले. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज , शिवप्रेमी, साधू संत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे राज्य आहे. त्यांची शिकवण आमच्या रक्तात आहे, त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालत आहे जाहीर केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत सर्व काही अलबेल नाही हे स्पष्ट होत असल्याने महायुतीतील घटक पक्षातील महत्वकांक्षी नेत्यांच्या मुळे खाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
त्याचा फटका महायुतीतील उमेदवारांना बसू शकतो अशीच चर्चा आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वरून अलबेल आणि आतून गोंधळ असे चित्र दिसत आहे. त्याचा फ्टका राज्यातील इतर मतदारसंघासह पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात ही बसू शकतो अशी चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. या तीन मतदारसंघांपैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात याचा जास्त परिणाम दिसू शकतो अशी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात खासगीत चर्चा आहे.
उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत भोसरी आणि पिंपरी विधानसभेत स्पर्धा न होता उमेदवार निवडले गेले; परंतु चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून जगताप कुटुंबात स्पर्धा झालीच तसे पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये ही जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळाली. त्यामध्ये शंकर जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. घरगुती वाद लोकनेते स्व. लक्ष्मण भाऊ यांच्या मित्रमंडळी की ज्यांना लक्ष्मण भाऊ यांनी पाठच्या भावाप्रमाणे प्रेम दिले अशा दुसऱ्या ‘ भाऊ ‘ नी मध्यस्थी करीत जगताप कुटुंब एकत्रित ठेवले. त्यामुळे शंकर जगताप यांनी घरगुती वाद मितल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते. इतर इच्छुकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले; परंतु शंकर जगताप यांनाच उमेदवारी देत पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
पक्षातील नाराजाना पुन्हा सक्रिय करण्यासाठी अनेकांना कमिटमेंट दिल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात प्रमानिकतेचे हेच का फळ ? अशी चर्चा रंगली आहे. त्यातच जगताप यांनी स्थानिकानाच जास्त महत्त्व देत असल्याची ही चर्चा मतदारसंघात रंगत असल्याने जवळपास साडे सहा लाख मतदार संख्या पैकी अर्ध्याच्यावर बाहेरून कामानिमित्त, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांमध्ये ही संभ्रमावस्था निर्माण झाल्याची चर्चा आहे.
त्यात उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विरोध आणि भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी एका इंग्रजी वृत्त पत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधाची ऱ्ही ओढल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात खरेच अलबेल आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात नेहमीच एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप मध्ये नेत्याची वर एकी दिसत असली तरी खालील कार्यकर्ते खरेच एकत्रित होणार का ? याबाबत ही मतदारसंघात खुसपुस सुरू आहे.
त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात जरी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप असेल तरी उमेदवारी वरून रंगलेल्या नाराजी नाट्यानंतर ज्यांनी जगताप यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत आव्हान दिले होते ? उमेदवारी जगताप यांना जाहीर झाल्यानंतर इतर इच्छुकांनी काही कमिटमेंट वर पुन्हा सवगृही आलेले पदाधिकारी यांचे खरेच मतभेद संपले असले तरी मनभेद कमी होणार का ? अजित पवारांच्या योगिंच्या घोषणेला विरोध पाहता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोमिलन होणार का ? चिंचवड महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी स्थानिकांना प्राधान्य दिल्यामुळे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मध्ये अंतर्गत पसरलेली नाराजी दूर होणार का ? पक्ष आदेश असल्याने मतभेद मिटविण्यात यश आले तरी मनभेद दूर करण्यात जगताप यशस्वी होणार का ? अशा सारखे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात धोकेबजी होणार का? पक्षादेश म्हणून प्रामाणिक काम होणार हे दिनांक २३ च्या निकालात स्पष्ट होणार आहे.