पिंपरी चिंचवडराजकीय

अखेर पिंपरीचे उमेदवार अण्णा बनसोडेच ; अजितदादांनी उमेदवारी देत व्यक्त केला विश्वास

  • महायुतीतील घटक पक्षातील विरोधाला डावलून दिली उमेदवारी
  • बनसोडे यांना महायुतीतील विरोधाचा करावा लागणार सामना
  • त्या पदाधिकाऱ्यांची भूमिका राहणार महत्वाची

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

पडत्या काळात एकमेव आमदाराने मी अजितदादा यांच्याबरोबरच राहणार ही महत्वाची भूमिका घेणाऱ्या आमदार अण्णा बनसोड यांना महायुतीत वाढलेला विरोध पाहून ही २०२४ च्या विधानसभेची उमेदवारी ‘बहाल’ केली. त्यामुळे बनसोडे यांच्या विरोधात वज्रमूठ बांधलेल्या त्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आता काय राहणार, महायुतीचे वरिष्ठ संबंधितांना कोणती ताकीद देणार? का ते पदाधिकारी आमदार बनसोडे यांच्या विरोधी भूमिका घेत बंडखोरी करणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत; हे जरी खरे असले तरी आमदार अण्णा बनसोडे यांनी ‘ हिला डाला ना ‘ … अशा प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होवू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेताच पिंपरी चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांपैकी एकमेव पिंपरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वाट्याला आला आहे. त्याच्या उमेदवारीवरून बनसोडे यांना पक्षासह महायुतील घटक पक्षातील नगरसेवकांचा विरोध असल्याचे जाहीर करीत आपल्या समर्थकांना पुढे केले होते. परंतु अजितदादा यांनी या सर्व गोष्टी कानामागे टाकत अण्णा बनसोडे यांनाच उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे बनसोडे यांचे संबंधितांना काम करावे लागणार आहे.

मंगळवारी (दि.२२) महायुतीला जवळपास १८ माजी नगरसेवकांनी बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे, भाजपचे राजेश पिल्ले, आर पी आय च्या चंद्रकांता सोनकांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काळूराम पवार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या बैठकीत आम्ही पिंपरी साठी इच्छुक आहे. जर बनसोडे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही; असा त्यांच्यासह जवळपास १८ माजी नगरसेवकांनी पवित्रा घेत महायुतीला इशारा दिला होता. त्या अगोदर एक दिवस झालेल्या पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल यांनी अप्रत्यक्ष रित्या इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.