लाडक्या बहिणी, बटेंगे तो कटेंगे आणि आरक्षण मुद्दावर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धूळधाण ; महायुतीची जोरदार मुसंडी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता
भाजप ठरतोय एक नंबरचा पक्ष
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची मोठी पिछेहाट
मावळ पॅटर्न अयशस्वी होताना दिसत आहे
शिवसेना एकनाथ शिंदे गटाची मोठ्या विजयाकडे कूच
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ही मोठी आघाडी
अनेक दिग्गजांना स्वीकारावा लागणार आहे पराभवाचा धक्का
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मोठी पिछाडी सहन करावी लागत आहे. महायुतीने २८८ जागांपैकी जवळपास २१० जगापेक्षा जात जगावर मोठी आघाडी मिळत आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत पुढे आल्याने भाजप पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असून त्या जागेवर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे ही उमेदवार मोठ्या आघाडीसह पुढे आहेत. यात मात्र महाविकास आघाडी ची धूळधाण उडाली आहे. सर्वात जास्त फटका मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोठी पिछाडी झाली असल्याचे दिसत आहेत.
शनिवारी सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून महायुतीने आघाडी घेण्यास सुरुवात झाली पाचव्या फेरीपर्यंत कोणाला आघाडी मिळेल असे वातावरण असताना मात्र त्यांना महायुतीने टॉप गिअर टाकत मोठ्या आघाडीकडे कुछ केली. जवळपास २०० जागाच्या वरती महायुतीने मुसंडी मारली. आणि तीच आघाडी जवळपास दहाव्या फेरीपर्यंत राहिल्याने महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोठे आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीने गाफील राहिली. त्याच्या उलट महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये नियोजनबद्ध विविध योजना पुढे करून मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविण्याचे दिसत आहे.
त्याअनुषंगाने लाडकी बहिण योजना राबवून महाराष्ट्रातील महिलाना खुश करण्यात यश मिळविले. या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये महिला भगिनींनी प्रचंड उत्साहात मतदान केल्याचे मतनदाच्या आघाडीवरून दिसले. त्याचबरोबर बटेंगे तो कटेंगे या मुद्यावर ही हिंदू मतदारांनी महायुतीच्या उमेदवारीवर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्याचे दिसत आहे. जातीपातीच्या ध्रुविकेणामुळे हिंदू मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदान टाकल्याचे दिसत आहे. तर मराठा, ओबीसी आणि इतर आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने ठोस भूमिका न घेतल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती कडून भाजपा मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. आणि ते आता मुख्यमंत्री होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे भाजपने २०१९ च्या निवडणुकीत ही १०५ जागा घेऊन पहिला क्रमांक मिळविला असताना ही उपमुख्यमंत्री पदावर भाजपला समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भाजप पक्षात याची सल होती. ती सल २०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाने भरून काढली असून महायुतीमध्ये भाजप हा पक्ष सर्वात मोठा पक्षातून पुढे आल्याने आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा विश्वास आता भाजपला असल्याने सर्व महाराष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्री पदाकडे लागले आहे.
सर्वच विभागात महायुतीने मोठी बाजी मारली आहे. भाजप १२६, शिवसेना एकनाथ शिंदे ५६ आणि अजित पवार ३५ जगावर उमेदवार आघाडीवर असून महायुतीचे २१५ जगावर विजयाच्या दृष्टीने कुछ होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सर्व जागा या सद्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या ५४ जगापर्यंत ही पोहचत नाही यावर महाविकास आघाडीने आता विचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये महायुती च्या तिन्ही जगावर मोठा विजय अनुक्रमे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे यांच्यासह मावळ पॅटर्न ची चर्चा असणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात ही आमदार सुनील शेळके हे मोठ्या विजयाकडे वाटचाल करीत आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर , पुणे या पश्चिम महाराष्ट्रात ही महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या खाईत लोटल्याचे दिसत आहेत.