विरोधी पक्षांनी आता पराभवाचे आत्मचिंतन करावे ; आमचा एकजुटीचा विजय आहे : देवेंद्र फडणवीस
आम्ही आधुनिक अभिमन्यू आहे; आम्ही चक्रव्यूह भेदला आहे
एक है तो सेफ है या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेचा कौल
लाडक्या बहिणीमुळे यश शक्य
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची यावर शिक्कामोर्तब
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहे. जनतेचे आभार मानतो. आम्ही म्हणत होतो आधुनिक अभिमन्यू आहे आम्ही चक्रव्यूह भेदून दाखविली. एक है तो सेफ है हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता त्याला महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. विरोधकांनी पराभवाचे आत्मचितन करून पराभवाची करणे काय आहेत याची कारणमीमांसा करणे विरोधकांना आवश्यकता आहे असे मत महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले.
लाडक्या बहिणींना श्रेय
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात मतदानाचा कौल दिल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, लाडकी बहिण, शेतकरी, लाडके भाऊ यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. हे यश लाडक्या बहिणीमुळे शक्य झालं. फेक नेरिटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात होता त्याला मतदारांनी जागा दाखविली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एकनाथ शिंदे , अजित पवार यांचीच
मुळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीच आहे या निकालावरून सिद्ध झाले आहे. या यशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तम साथ मिळाली. सामूहिक ताकदीमुळे विजय शक्य झालं. महाविकास आघाडीने ठरवून आम्हाला टार्गेट केले होते त्याला जनतेने निकालातून उत्तर दिले आहे. विषारी प्रचाराला जनतेने उत्तर दिले आहे. लोकशाही मध्ये विरोधी पक्ष ही सक्षम असणे आवश्यक आहे. आम्ही त्यांच्या सूचनांचा ही विचार करू असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
मराठा आणि ओ बी सी समाजाचा आमच्यावर विश्वास
मुख्यमंत्री बाबत अमित शहा यांनी सांगितले आहे की महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित बसून घेतील. मुख्यमंत्री पदावर कोणता ही वाद नाही. लोकसभा निवडणुकीत ४३.६ टक्के मतदान होते .जर आमच्याबरोबर मराठा, ओ बी सी समाज नसता तर एवढी जनता आमच्याबरोबर राहिली नसती. मी चाणक्य नाही. मी पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. माझे नेतृत्व सर्वमान्य करतात हे यश सर्वांच्या मेहनितीचे आहे.