पिंपरी चिंचवड

शिवसैनिकांच्या निष्ठेमुळे महायुतीचा विजय सोपा: इरफानभाई सय्यद

जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत

शाहूनगरमध्ये एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांचा विजयोत्सव साजरा

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार बहुमतात आले आहे. राज्यातील मायबाप मतदारांनी आणि लाडक्या बहिणींनी स्पष्ट कौल महायुतीला दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा रयतेचे राज्य स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघात महायुती सरकारचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्याबद्दल जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, अशा भावना शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी व्यक्त केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांचे सकारात्मक निकाल लागताच इरफान सय्यद यांच्या शाहूनगर येथील कार्यालयात मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा जल्लोष साजरा केला. फटाके फोडत आणि पेढे एकमेकांना भरवून विजयोत्सव साजरा केला. त्यावेळीशिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, भोसरी विधानसभा प्रमुख संभाजीराव शिरसाठ, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष किसनशेठ बावकर, उद्योजक रवीभाऊ गोडेकर,युवासेना उपजिल्हा प्रमुख अरुण जोगदंड, अंकुशशेठ मळेकर,संजयभाऊ ससाणे, विकी हताळे,अनिल मोरे,संकेत चावरे, प्रसाद बनसोडे, नागेश व्हनवटे, श्रीकांत सुतार, समर्थ नाइकवाडे आणि महाराष्ट्र मजदुर संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना इरफानभाई सय्यद म्हणाले, ”१५ व्या विधानसभा निवडणूकीचा निकाल आज शनिवारी जाहीर झाला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले. तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. माझ्या शिवसैनिकांनी जीवाचे रान करीत या तीनही मतदारसंघात महायुतीच्या या उमेदवारांचे मोठ्या निष्ठेने काम केले. त्यामुळे हा विजय आणखी सोपा झाला याचं देखील या विजयात मोठ योगदान आहे.