महाराष्ट्र

कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांची शेवटच्या फेरीत अखेर बाजी

१ हजार २५५ मतांनी रोहित पवार विजयी

रोहित पवारांना १ लाख २७ हजार ६८८ मते

राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते

लोकमान्य टाइम्स : अहिल्यादेवीनगर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस रंगली होती. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अवघ्या १ हजार २५५ मतांनी विजय मिळवला.

परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळे निकालाची घोषणा लांबणीवर पडली आहे. सुरूवातीपासून मजमोजणीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोचत होती. कारण राम शिंदे कधी पुढे असायचे, तर रोहित पवार पुढे असायचे. शेवटी राम शिंदेंकडून रोहित पवारांनी विजय खेचून आणतील.

कर्जत-जामखेड मतदारसंघात २६ फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत रोहित पवार ३९१ मतांची आघाडी होती. परंतु राम शिंदे यांनी परत फेर मोजणीचा अर्ज दिला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच लागली. यानंतर फायनल मतमोजणीनंतर रोहित पवारांना १ लाख २७ हजार ६८८ मते मिळाली तर राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली.  

२०१९ च्या विधानसभेला कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. कर्जत- जामखेड मतदार संघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते.  या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते.  राम शिंदे यांना ९२ हजार ४७७ मते पडली होती. तर रोहित पवार यांनी १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला होता.