पिंपरी चिंचवडबातम्या

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळा’चे आज भूमिपूजन

  • केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप ‘शक्तिस्थळ’ या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी (दिनांक ११ ) सकाळी ९ वाजता मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे येथे करण्यात येणार आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार व नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष  विजय उर्फ आप्पा रेणुसे यांच्यासह आमदार महेशदादा लांडगे, शंकर मांडेकर, अण्णा बनसोडे, उमाताई खापरे, सुनील शेळके  व अमित गोरखे यांची देखील या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल.

या सोहळ्याचे निमंत्रक माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार शंकर पांडुरंग जगताप आणि विजय पांडुरंग जगताप यांनी ही माहिती दिली.