मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत ; श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरात पिंपरी चिंचवड शहर भाजपचे साकडे
- मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे ही जनतेची इच्छा : अमर साबळे
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करीत २८८ पैकी २३४ जागा जिंकल्या. भाजप ने १३२ जागावर विजय मिळविला. त्याअनुषंगाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान व्हावेत, यासाठी मा. राज्यसभा खासदार, प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी (दिनांक २९) चिंचवड येथे श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या मंदिरात श्री गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात आले.
यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे , भाजपा पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक माऊली थोरात चंद्रकांत नखाते मोरेश्वर शेंडगे ,सुरेश भोईर, भाजपा महिला शहराध्यक्ष सुजाताताई पलांडे, राजू दुर्गे गणेश वाळूंजकर ,विजय सिनकर, दीपक नागरगोजे , संजय मंगुडेकर, राधिका बोरलीकर, अजय पाताडे, वैशाली खाडे, वेणू साबळे, सम्यक साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणीस विराजमान व्हावेत ही जनतेची इच्छा
महाराष्ट्र विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश महायुतीला प्राप्त झाले असून या महाविजयाचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महायुतीचे नेते श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत. ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पाहिजेत अशी जनतेची इच्छा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. त्यांना त्यासाठी दीर्घायुष्य लाभावे यासाठी श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या मंदिरात श्री गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात आले.
- अमर साबळे
प्रदेश उपाध्यक्ष भाजप , माजी राज्यसभा सदस्य