बातम्या

दिनेश यादव यांच्या भाजप सदस्य नोंदणीची प्रेदशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून दखल

  • भाजपा सदस्यता नोंदणीस चिखली-कुदळवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद..
  • दोन हजार पेक्षा जास्त सदस्य नोंदणी

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्यता नोंदणीस चिखली-कुदळवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजयुमो शहर सरचिटणीस दिनेश यादव यांच्या प्रयत्नातून या संघटन पर्वात तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक सदस्यता नोंदणी करण्यात आली.

या कामगिरीची दखल थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. दोन हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल दिनेश यादव यांना बावनकुळे यांनी पत्र पाठवून त्यांचे विशेष कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

दोन हजार सदस्य पक्षासोबत जोडून संघटना बळकट करण्यास हातभार : चंद्रशेखर बावनकुळे

लोकांप्रती असलेले बांधिलकी आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या कार्यातून अधोरेखित होत असल्याचे मत त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे. संघटन पर्वात दोन हजार सदस्य भाजप सोबत जोडून संघटना बळकट केली असल्याचे मत त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

आमदार महेश दादा यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व शक्य

”पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे राष्ट्र प्रथम आणि नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हा संकल्प उराशी बाळगला. चिखली कुदळवाडी परिसरात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजारांपेक्षा अधिक सक्रिय सदस्यता नोंदणी केली. यात मोठ्या संख्येने युवावर्ग, जेष्ठ आणि महिलांचाही सहभाग आहे. यापुढेही हे कार्य असेच सुरू राहणार आहे.”

  • दिनेश यादव, सरचिटणीस – भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहर…