जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकरी
डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती
लोकमान्य टाइम्स : पुणे
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात त्यांना गुरुवारी पत्राद्वारे अप्पर मुख्य सचिव (सेवा ) व्ही. राधा यांनी आदेश दिले आहेत.
अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांचे आदेश
दिलेल्या आदेशामध्ये शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती जिल्हाधिकारी पुणे या पदावर डॉ. सुहास दिवसे , भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. आपल्या जागी श्री संतोष पाटील, यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार डॉ. सुहास दिवसे , भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा अशा सूचना अप्पर मुख्य सचिव (सेवा ) व्ही राधा यांनी दिले आहेत.
जितेंद्र डुडी हे २०१६ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते मूळचे जयपूर (राज्यस्थान ) आहेत. त्यांची सुरुवातीला झारखंड मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहायक सचिव म्हणून ही काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणून ही काम केले आहे. त्यांच्या पत्नी पोलीस दलात आयपीएस अधिकारी आहेत.