वस्तादांसाठी पिंपरी चिंचवडचे शरद पवार अशी ओळख असणारे लांडे झाले सक्रिय
- शिरूर लोकसभा मतदारसंघासह पिंपरी चिंचवड मध्ये साहेबांच्या विचाराचे आमदार निवडूण आणण्यासाठी करणार प्रयत्न
- माजी आमदार व शिक्षण सम्राट , उद्योजक विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा अखेर घेतला निर्णय
- पुणे जिल्ह्यातील आजी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आणण्यासाठी लांडे झाले सक्रिय
- भोसरी, खेड, मावळ, पिंपरी येथील आमदार निवडून आणण्यासाठी लांडे झाले सक्रिय
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
अखेर पिंपरी चिंचवड शहराचे शरद पवार असे ओळख असणारे माजी आमदार आणि शिक्षण सम्राट , उद्योजक विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय मंगळवारी (दिनांक १५) घेतला. मी कोणत्याच निवडणुकीसाठी इच्छूक नसून साहेबांच्या विचाराचे आमदार निवडून आणणे हेच माझे ध्येय असल्याचे स्पष्ट करीत भोसरी, मावळ, खेड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी भूमिका जाहीर केल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे शरद पवार अशी ओळख असणारे विलास लांडे सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उत्साह निर्माण झाले आहे.
शरद पवार यांच्या प्रमाणेच विलास लांडे यांचे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लहान सहान गावात ही उत्तम ओळख आहे. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते व कामाच्या जोरावर जोडलेले मित्रमंडळी यांच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोठे ही गेलात की विलास लांडे माहीत नाहीत असा माणूस सापडत नाही. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी जिल्ह्याचे, गावाचे नाव सांगितले की तेथील खडानखडा माहिती सांगणारे विलास लांडे अशी त्यांची ओळख आहे. तसेच विधानसभेच्या आवारात अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पासून ते क्लास वन अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थपित करणारे पैकी विलास लांडे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यातील कोणता ही पक्ष असो तेथे कामाच्या जोरावर सलोख्याचे संबंध निर्माण केल्याने त्यांना पिंपरी चिंचवड शहरातील दुसरे शरद पवार अशी ओळख निर्माण झाली आहे. राजकारण म्हणलं की हार जीत असते, कोणी येथे ताम्रपट घेऊन जन्माला घेऊन आलेले नाही असे म्हणत काम करत राहिले पाहिजे यावर लांडे यांचा जोर असतो. त्या लांडे यांनी राजकारणातील गुरू शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन मी आपल्या सोबत आहे आणि यापुढे ही राहणार असल्याचे सांगत आपण जी जबाबदारी द्याल ती पूर्ण करणार आहे असे स्पष्ट केले. तसेच लोकसभेला आपण सांगितल्या नुसार खासदार अमोल कोल्हे यांचे काम केल्याचे हे त्यांनी यावेळी मान्य केले. साहेब यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा जो आदेश देतील ती जबाबदारी आपण घेऊन ती पूर्ण करणार असल्याचे ही ते सांगायला विसरले नाही. लवकर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार साहेब यांची सभा घेऊन माझ्यासह विविध पक्षातील नाराज लोकप्रतिनिधी जाहीर प्रवेश करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांचे बंधू डॉ. अमोल बेनके हे ही उपस्थित होते.