अण्णा बनसोडे यांची हॅट्रिक
महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शिलवंत यांना ७२ हजार ५७५ मते
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांचा दणदणीत विजय प्राप्त केला आहे. त्यांना १,०९,२३९ इतकी मतं मिळाली आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांना ७२,५७५ इतकी मतं मिळाली आहेत. त्यांनी ३६,६६४ मतांचं मताधिक्क्य मिळवत शीलवंत यांचा निवडणुकीत पराभव करीत आमदारकीची हॅट्रिक केली.
एकूण वीस फेऱ्या झाल्या. सुरवातीपासून बनसोडे त्यांनी मतांची आघाडी राखली होती. त्यामुळे त्यांचा विजय पक्का झाला. त्यांच्या विजयामुळे पिंपरीतील भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
पिंपरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे तर, प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत हे दोघे होते. त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोज गरबडे यांना ७१७३ इतकी मत मिळाली असून नोटाला ४०१३ इतकी मत मिळाली आहेत.