कर्जमाफीसाठी पैसे नाहीत; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात डबल बेड अन किचन दुरुस्तीसाठी ४० लाखाहून अधिक खर्च
- रोहित पवार यांचा पुराव्यानिशी घणाघात
- X माध्यमावर टाकली त्या कामाबाबतची ई निविदा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना एकीकडे सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नाही.
तर दुसरीकडे राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्रयांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी डब्ब्ल बेड मॅट्रेस, सोफा यासाठी २० लाख ४७ हजार रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९ लाख ५३ हजार असे एकूण ४० लाखापेक्षा अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
त्यांनी X माध्यमावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत फटकारले आहे. सोबत त्यांनी या संदर्भातील ई निविदाही जोडली आहे.
राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिक डोळ्यादेखत आडवी झाली आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सरकारवर दबाव वाढतोय
आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत कर्जमाफी दिली जात नसताना राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्ष निवासस्थानी डबले बेड मॅट्रेस , सोफा यसथु २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसे खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाचा उतमात म्हणावा की वाढलेली महागाई ?
मंत्र्यांच्या घरांची दुरुस्ती केली पाहिजे ; पण केव्हा?
मुख्यामंत्री याना कदाचित हे माहित नसेल पण हे असच चालू राहील तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे ‘ असाच त्याचा अर्थ निघेल … मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची काम केली पाहिजेत पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचा ही ताळमेळ असला पाहिजे ना.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

