पिंपरी चिंचवडपुणे

भोसरी विधानसभा ‘मनसे’ चा अध्यक्ष बनलाय कामगारांचा ‘वाली’ 

  •  कामगारांचे थकीत पगार कामगारांच्या हातात 
  • कामगारांच्यामध्ये उत्साह 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना वालीच नसल्याची परस्थिती निर्माण झाली आहे. काही संघटना आहेत त्या त्यांचा राजकारण आणि त्यातून अर्थकारण करण्यात गुंग असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे जे संघटित न होता जे मिळेल ते काम करीत आहेत त्याना वालीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कंपन्यामध्ये कामगारांचे पगार देण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे.

कारखान्यात घाम गाळल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या घरात चूल पेटते. मात्र काही प्रशासनात काम करणारे आणि कामगारांच्या टाळू वरील लोणी खाण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कामगारांचे पगार आणि इतर देणी थकविण्यात येत असल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशा कामगारांना न्याय देण्यासाठी भोसरी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी पुढाकार घेऊन अनेकांना त्यांचे थकीत पगार आणि इतर देणी वसूल करून दिले आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभा अध्यक्ष बनलाय कामामरांचा वाली अशी चर्चा कामगारांच्यामध्ये वाढीस लागली आहे. 

पिंपरी चिंचवड शहर हे जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये भोसरी, पिंपरी आणि चिंचवड हे तीन मोठे औद्योगिक क्षेत्रे आहेत. भोसरी आणि परिसरातील औद्योगिक पट्ट्यात देशाच्या कानकोपऱ्यातील नावाजलेल्या विविध क्षेत्रातील मोठे कारखाने आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर अवलंबून असणारे लघु उद्योग स्थित आहेत. याठिकाणी हजारो असंघटित कामगार काम करत आहेत. या  कारखान्यात कामगार पुरविणारे ठेकेदार  (लेबर कॉन्ट्रॅक्टर) यांची मोठी संख्या आहे.  बहुतांशी ठेकेदार हे त्या कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत असल्याचा आरोप अनेक वेळा होत असल्याच्या तक्रारी कामगार आयुक्तालयात पडून आहेत. 

पण या कामगारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक काम करत आहेत. कामगार क्षेत्रात कोणती ही अडचण निर्माण झाली, संबंधित प्रशासन या ठेकेदार ती निर्माण केली तर् संबंधित कामगारांना न्याय देण्यासाठी मनसे सर्वात आग्रेसर दिसत आहे.

त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील कारखान्यात कोणत्या कामगारांचा पगार थकवाला, विना कारण त्यांना कामावरून कमी केले या इतर काही प्रश्न निर्माण झाले तर् त्यासाठी भोसरी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील असा विश्वास अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी व्यक्त केला आहे. कामगारांच्या प्रश्नासाठी व इतर  अडी अडचणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोसरी विधासभा मतदारसंघाचे कार्यालय नेहमीच उघडे राहील. त्यामुळे अशा अडचणी असणणाऱ्या कामगारांनी कार्यालशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी तापकीर यांनी केले आहे.