महाराष्ट्रराजकीय

सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तिन्ही पक्षांच्या आहेत ; कुठल्याही एका पक्षाच्या नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • निवडणुका आल्या की जनतेते जाऊनच मतांचा जोगवा मागणं याला लोकशाही म्हणतात
  • आम्हाला मतदान करतीलच असं कुणाला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरु झालेली योजना आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सरकारमध्ये एकत्रच आहोत. अनेक नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठे दोन पक्षांची युती आहे, कुठे अजून दोन पक्षांची युती आहे. पण हे जरी असलं तरीही सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत. त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तिन्ही पक्षांच्या आहेत कुठल्याही एका पक्षाच्या नाहीत.” 

लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही 

निवडणुका आल्या की जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागणं यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतीलच असं कुणाला वाटत असेल तर ते अयोग्य आहे. आमच्या परिने जेवढं जनतेत गेलं पाहिजे असं वाटतं आहे तेवढं आम्ही जातो आहे. ज्यांना वाटतं की जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत. ज्यांना वाटत नाहीत ते जात नाहीत, मला त्यांच्या बाबत काही बोलायचं नाही. 

त्यांनी काय म्हंटल ते मला माहीत नाही 

अंजली दमानिया यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की २४ तासांत अजित पवारांचा राजीनामा घ्या. याबाबत विचारलं असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंजली दमानिया यांनी काय म्हटलं आहे ते मला माहीत नाही, मी पाहिलं नाही असं उत्तर दिलं आहे.