सातारा पोलीस अधीक्षकपदी निखिल पिंगळे : निपक्ष आणि पारदर्शक कामाची हमी
- तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषींची सांगली पोलीस आयुक्त पदावर बदली
- सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी पोलीसनी मंत्र्यांना मारहाण केल्याचा होता ठपका
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्यावेळी महायुतीत सत्तेत सहभागी असणारे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (युती) एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अध्यक्ष आमचाच होणार असा विश्वास भाजपा आणि शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या मंत्र्यांनी व्यक्त केला होता.
या निवडीच्या दरम्यान भाजपला पोलीस प्रशासनाने साथ दिली आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांना पदाधिकारी निवडीच्यावेळी मुख्य सभागृहात जाण्यास अटकावं केला. तसेच शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप पोलिसांच्यावर करण्यात आला. त्याचा ठपका तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर ठेवण्यात आला.
राजकीय शह- काटशहाच्या राजकारणात तुषार दोषींची सांगली पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दोषींच्या जागेवर पुण्याचे पोलीस उपायुक्त म्हणून काम करणारे निखिल पिंगळे यांना सातारा पोलीस अधीक्षक म्हणून पुण्यावरून सातारला पाठविण्यात आले आहे. बुधवारी (दि. २२) त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला.
त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रचंड विश्वासाने आणि जबाबदारीने माझ्या वरिष्ठानी मला येथे पाठविले आहे. त्यांच्या मला सूचना आहेत, त्याची अमलबजावणी करणे हे माझे आद्य कर्तव्य असल्याचे नमूद केले.
निपक्षपातीपणे, पारदर्शकपणे काम करणे हे पोलीस अधीक्षक म्हणून माझे कर्तव्य आहेच, त्याच बरोबर माझी टीम आहे, स्टाफ आहे त्यांच्याकडून ते अपेक्षित असल्याचे मत पिंगळे यांनी व्यक्त केले.
आज येथे मी चार्ज घेतला आहे. जो काही कालावधी मला मिळेल, त्यात या जिल्ह्याला, या जिल्ह्यातील नागरिकांना अधिक अधिक मला काय देता येईल, जो काही बदल करण्यासाठी तयार राहणे हे माझे काम राहणार आहे.
लोकाभिमुख प्रशासन ज्याला आपण म्हणतो, नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
जवळपास वीस महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून येथे कार्यभार स्वीकारतोय, येथे आलोय. यापूर्वी दोन जिल्हे मी केले आहेत. तिकडच्या लोकांच्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या होत्या, तिकडची ठेवणं भूगोलिक, ऐतिहासिक वेगळी होती.
इथल्या अडचणी समजून घेणे, आणि एक एक करुन त्याच्यावर मार्ग काढणे याला प्रधान्यक्रम राहील. आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये सरते शेवटी की आपण आलो आणि आपण जाताना हा जो फरक आहे तो लोकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगल प्रशासन आपण देऊ शकलो, हे महत्वाचे आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावेळी व्यक्त केला.
____________________

