पुणेराजकीय

‘ शांतता आणि संयमाचा दरवाजा बंद केला आहे ; आता ज्या भाषेत तुम्हाला समजतंय त्या भाषेत उत्तर मिळाले ‘ : आमदार महेशदादा लांडगे समर्थकांच्या सोशल मिडियावरील पोस्टची शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा

  • तुम सबपे भारी ..एक अकेला खिलाडी…! फक्त महेशदादा
  • महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांसह भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना जणू इशाराच ?
  • महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांनी केले होते आमदार महेशदादा यांना टार्गेट
  • त्यावरून दिघीच्या जाहीर सभेत आमदार लांडगे यांनी दिला होता संबंधित पदाधिकाऱ्या सल्ला वजा इशारा
  • सोशल मीडियातून आमदार लांडगे यांना केले होते महाविकास आघाडीने टार्गेट
  • महेश लांडगे यांनी आमदारकीची हॅट्रिक करताच लांडगे समर्थक झाले आक्रमक

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली त्या तीन ते चार विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भोसरी विधानसभेची जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात निवडणुकीच्या मतदान होईपर्यंत निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

महायुतीकडून आमदार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांच्यात सामना होता. ही निवडणूक आरोप प्रत्यारोप यांच्यावरच गाजली. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून ते मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लांडगे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

त्याअनुषंगाने लांडगे यांच्या संयमाचा बांध फुटून त्यांनी दिघी येथील जाहीर सभेत मागच्या तीन महिन्यात मी सगळे सहन केले आहे. माझ्या शांततेचा अंत बघू नका, माझा राजकारण हा पिंड नाही, मी दहा वर्षात सर्व सोडले होते, मला पुन्हा पहिल्या रूपात येण्यास भाग पडू नका असा सल्ला वजा इशारा दिल्याने भोसरीचे राजकारण कोणत्या दिशेला जाईल याबाबत मतदारांच्या जोरदार चर्चा रंगली होती. २० ला मतदान झाले आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागला.

राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची जी धूळधाण झाली तीच अवस्था भोसरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची होऊन आमदार महेश लांडगे यांनी तब्बल ६३ हजार मतांच्या फरकाने ही निवडणुक जिंकत हवेली नंतर भोसरी विधानसभा मतदारसंघ उदयास आल्यानंतर प्रथमच हॅट्रिक करण्याचा इतिहास केला.

आमदार महेशदादा यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी या विजयाचा जोरदार जल्लोष केला. हिंदुत्ववादी आमदार अशी ओळख पूर्ण महाराष्ट्र निर्माण करण्यात त्यांना यश आले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही या यशाचे जोरात स्वागत करीत मतदारसंघात एकच जल्लोष केला. त्यात राज्यात महायुतीची एकतर्फी सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यात भाजप चे १३२ आमदार निवडून आल्याने मुख्यमंत्री भाजप चाच होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर महायुतीच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील आमदारांची वर्णी लागणार असल्याने जी चार नावे आघाडीवर आहेत त्यात आमदार महेशदादा लांडगे यांचे ही नाव असल्याने लांडगे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे आमदार महेशदादा लांडगे यांचे मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोशमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार केले असे व यासारखे अनेक आरोप केले गेले. त्याला कोणतेच उत्तर न देता महेश लांडगे यांनी मी दोन पंचवार्षिक कार्यकाळात केलेले काम बघा आणि त्याअनुषंगाने समाविष्ट गावातील सोसायट्या पुरविलेल्या सोयी सुविधांचा प्रचार पोहचविण्यात यशस्वी झाल्याने मतदारांनी त्यांच्या पारड्यात मतदान टाकल्याचे सिद्ध झाले, आहेत.

त्याला जोड म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महिलाना बस प्रवास सवलत योजना, शेती वीज बिल माफ, ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास मोफत, पेन्शन योजना यांच्यासह केंद्रातील विविध लोकपयोगी योजनाचा हातभार आणि राष्ट्रीय स्वयं संघ यांची मिळालेली साथ यामुळे आमदार महेश लांडगे यांचा विजयास हातभार लागला.

पण ज्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि मतदार संघातील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लांडगे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आमदार लांडगे आणि त्यांचे समर्थक व्यथित झाल्याचे दिसत होते. आता आमदार लांडगे यांनी बाजी मारल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या महाविकास आघाडीतील पदाधिकारी यांना अप्रत्यक्षरीत्या शांतता आणि संयमाचा दरवाजा बंद केला आहे, आता ज्या भाषेत तुम्हाला समजतंय त्या भाषेत उत्तर मिळाले… तुम सब पे भारी…एक अकेला खिलाडी..! फक्त महेशदादा अशा पोस्ट सामाजिक माध्यमावर आमदार लांडगे यांच्या समर्थकांकडून व्हायरल होऊ लागल्याने या पोस्टची चर्चा शहरासह पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.