स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन
- कोल्हापूर जिल्ह्यातून झाली सुरुवात
- महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली संयुक्त पत्रकार परिषद
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
खरा पक्ष व चिन्ह कोणाचे यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न्यायालयीन लढाई सुरु असतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झाले आहे. त्याची सुरुवात कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड येथून राष्ट्रवादी काँग्रेचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केले. या मनोमीलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवंचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे
२०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १०६ जगावर भाजपने विजय मिळविला होता. शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३ काँग्रेस ४३ , अपक्ष १३ व इतर पक्षांनी मिळून ऐकनू १७ जागा जिंकल्या होत्या. पक्षीय बलाबल पाहता पुन्हा युतीचेच सरकार स्थापन होणार असे वाटत असताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. त्यांनी युतीबरोबर जाणाऱ्या शिवसेनेला बरोबर घेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांबरोबर घेऊन उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री व अजित पवार याना उपमुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवले.
ही सल भाजपच्या मनात होती. अडीच ते तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत असल्याचे दिसत असले तरी अंतर्गत धुसपूस भाजपने हेरली. आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट नाराज असल्याचे हेरून त्यांच्यावर गळ टाकला. शिंदे यांना आघाडीतून बाहेर पडायला लावून पुन्हा युतीचे सरकार सत्तेत आणले; आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रमाणे त्यांना व भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते त्या प्रमाणे शरद पवार आणि महाविकास आघाडी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांनी यश मिळविले.
युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी असतना ही पक्षश्रेष्ठिच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केले. तर देवेंद्र फडणवीस याना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानले. शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादीत ही दुफाळी असल्याचे समजताच फडणवीस यांनी अजित पवार यांना शरद पवार यांच्यापासून बाजूला केले. आणि त्यांना महायुतीत समाविष्ट करून घेत उपमुख्यमंत्री आणि नऊ मंत्री पदे दिली. तसेच त्यांच्यावर असणाऱ्या सिंचन घोट्याळ्यातून क्लिनचीट दिली .
त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहावयास मिळाला. त्यामध्ये एकूण ४८ जागांपैकी महाविकासआघाडीने ३१ जागेवर तर महायुतीला १७ जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडीच मोठा विजय मिळविलं असा दावा करण्यात येत होता. मात्र लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे एकमेकातील हेवेदावे बाजूला सारले.
महायुती म्हणून एकत्रित आणि नियोजनबद्ध निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे २३६ जगावर दणदणीत विजय मिळविला. आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची हवा महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याने विधानसभेला त्यांना फक्त ४९ जागेवरच समाधान मानावे लागले. १३२ जागा भाजपने जिंकल्या. एकनाथ शिंदे शिवसेना ५७, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ यश मिळविले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार याना संधी देण्यात आली.
पक्ष वाढविण्याची मोठी संधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पक्ष वाढविण्याची मोठी संधी असते. त्यामुळे जर एकत्रित निवडणुका लढल्या तर जागा कमी मिळणार, त्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही, हे पाहता महायुती म्हणून एकत्रित लढल्यास त्याचा फटका पक्षाच्या वाढीस बसेल अशी चर्चा पक्षांतर्गत झाल्यानंतर जिथे आवशकता आहे तेथे युती अन्यथा स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात असे विचारांती ठरल्याने मुंबई वगळता राज्यात स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय महायुतीतील मित्र पक्षांनी घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या एकीने कार्यकर्ते सुखावले
दरम्यान महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष वेगवेगळे झाल्यापासून सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठे साहेब आणि दादा या दोघांनी एकत्रित यावे अशी मनीषा बाळगून आहेत. त्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणी याबाबत बँनरबाजी ही करण्यात आली आहे. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यानिमित्याने महाराष्ट्रातील काका पुतण्याची जोडी पुन्हा एकत्रित येताना दिसत आहे. त्याची सुरुवात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेण्यासाठी विकास आघाडीच्या बॅनर खाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस चंदगडमध्ये एकत्रित आली आहे. त्याअनुषंगाने संयुक्त पत्रकारपरिषद घेत घोषणा ही करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते सुखावले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये बहुतांशी ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर अशी आघाडी करून जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे ते सत्यात उतरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.

