पिंपरी चिंचवडराजकीय

वाढत्या इच्छुकांमुळे महापालिका निवडणुकीत भाजपला लागणार बंडखोरीचे ग्रहण  

– १२८ जागेसाठी  ६०० पेक्षा जास्त अर्जाची विक्री 

– नेत्यांची डोकेदुखी वाढणार?

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

 महाराष्ट्रातील २९ महापालिका निडणूक दोन ते तीन दिवसात जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला इच्छुकांची पसंदी दिसत आहे.  त्यादृष्टीने भाजपने अर्ज विक्री सुरु केली आहे.  १२८ जागेसाठी आजपर्यंत जवळपास ६०० पेक्षा जास्त अर्ज गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर अर्ज गेल्याने या निवडणुकीच्या अनुषंगाने  पक्षासमोर बंडखोरीची समस्या आवसून उभी राहणार आहे? हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही.

महाराष्ट्रात पहिल्या टप्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदान दिनांक २ डिसेंबरला पार पडले. दुसऱ्या टप्यातील मतदान दि. २०  पार पडणार आहे. या सर्वांचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. पहिल्या टप्यातील निकाल पुढे ढकलल्यामुळे  त्याचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती  निवडणुकावर झाला आहे. या निवडणुका फेब्रुवारी मध्ये किंवा दहावी-बारावी परीक्षमुळे ही  मार्च-एप्रिल मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 २१ डिसेंबर ला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ३१ जानेवारी पर्यत च्या काळात महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या  अनुषंगाने राज्य निवडणुकीत आयोगाने तयारी सुरु केली आहे. या दृष्टीने हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन १० ते १५ डिसेंबर दरम्यान आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

त्यांदृष्टीने महायुतीतील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे सुतावेच करून त्यांदृष्टीने तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. या निवडणुकीला सामोरे जाणेसाठी कशी तयारी करावी, त्यांदृष्टीने मतदार यांच्याशी कसा संपर्क करायचा याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांदृष्टीने पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा समितीच्या वतीने इच्छुक यांना अर्ज वाटप सुरु केले आहे. त्याला इतर पक्षापेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

 या अर्ज विक्रीवरून भाजप पक्षाकडून निवडणुकीत लढविण्यासाठी युवकांसह नव्या-जुन्या कार्यकर्त्याचा मोठा सहभाग दिसत आहे. महापालिकेसाठी १२८ जागा आहेत. त्यासाठी जवळपास सहाशे पेक्षा जास्त अर्जंची विक्री झाली आहे. तर अर्ज घेणाऱ्यांचा ओघ सुरूच असल्याने आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी शहरातून इच्छुकांची रिघ सुरु असल्याचे भाजप पदाधिकारी बोलत असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे हे भाजप पदाधिकारी विसरताना दिसत आहेत. 

 प्रामाणिक कार्यकर्त्यावर वाट पाहणे एवढेच हातात  

भाजप पक्ष सत्ता टिकविण्यासाठी इतर पक्ष फोडण्यास मागे-पुढे पाहत नाही हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्तेसाठी त्याग हा करावा लागतो असे म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीपासून तिन्ही विधानसभा मतदारसंघात बाजूला सारले जाणार अशी चर्चा पक्षांतर्गत आहे. सर्व्हे च्या नावाखाली  आणि  शहरातील विधानसभा आणि विधानपरिषद असे प्रत्येकी दोन असे एकूण  चार आमदार यांच्या   नातेगोते आणि समर्थकानंतर इतरांचा विचार होऊ शकतो ; त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ता यांना उमेदवारीसाठी वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काही नसणार आहे? अशी चर्चा रंगू लागली आहे. 

कोणावर ही अन्याय होणार नाही 

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने घालून दिलेल्या नियमानुसार उमेदवारी अर्ज विक्री, तो जमा करणे, त्यांचे पक्षासाठी केलेले काम, संघटनात्मक काम याची दाखल घेतली जाणार, तसेच पक्षाकडून करण्यात आलेला सर्व्हे, जिल्हा पदाधिकारी कोर कमिटी यांनी केलेला सर्व्हे याचा अभ्यास करून उमेदवारीसाठी इच्छुकांची यादी प्रदेशाकडे पाठवली जाणार, त्यानंतर संबंधित इच्छुकाची सर्व माहिती गोळा झाल्यानंतर त्याबाबत प्रदेश स्तरावर उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर त्यामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही.

  • शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, शहर भाजप