राहुल गांधी जात असलेल्या राज्यात इंडिया आघाडी तुटत आहे; शिवराज सिंह चव्हाण यांचा आरोप
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी वर्षभरात ३-४ महिने सुट्टीवर असतात. मोदींनी एकदाही सुट्टी नाही घेतली, अशी तुलना त्यांनी केली.
शेतकऱ्यांना भरभरून दिले
भारत रत्न स्वामिनाथन यांनी दिलेल्या अहवालापेक्षा भाजपने शेतकऱ्यांना अधिक काही दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चेसाठी सर्वांना दरवाजे उघडे आहेत, असे त्यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात विधान केले.